मच्छिमारांनो सतर्क रहा! सागरी मार्गाने दहशतवादी येण्याची शक्यता, या क्रमांकावर संपर्क करा

मच्छिमारांनो सतर्क रहा! सागरी मार्गाने दहशतवादी येण्याची शक्यता, या क्रमांकावर संपर्क करा

रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सर्व मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

  • Share this:

दिनेश केळुसकर,प्रतिनिधी

रत्नागिरी, 29 जानेवारी : रत्नागिरीत पोलिसांनी सर्व मच्छिमारांना हायअलर्ट जारी केला आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून भारतात प्रवेश करुन हल्ल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे सागरी भागात समुद्रात संशयित जहाज, बोटी किंवा व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईवर झालेल्या हल्यात दहशतवादी सागरी मार्गाने आले होते. या हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्व सागरीकिनाऱ्यावर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. परंतु, आज रत्नागिरी पोलिसांनी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून भारतावर हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे.

त्यामुळे रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी सर्व मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. दहशतवादी सागरी मार्गाने भारतात प्रवेश करुन हल्ला करण्याची शक्यता असल्यानं सागरी किनारी भागात अगर समुद्रात संशयित जहाज, बोटी, होडी अगर व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष 02352/222222 ,100 किंवा कोस्ट्ल कंट्रोल टोल फ्री नंबर 1093 वर संपर्क करावा असं आवाहन केलं आहे.

====================================

First published: January 29, 2019, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading