राज्यात 1999च्या पुनरावृत्तीची शक्यता, मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

राज्यात 1999च्या पुनरावृत्तीची शक्यता, मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

पुन्हा 1999ची पुनरावृत्ती होते की संजय राऊत चाणक्यनिती वापरत उद्धव ठाकरेंचं शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर: राज्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं ते सत्ता स्थापनेपासून मागे हटण्याच्या भाजपाच्या भूमिकेमुळे. सध्याचं राजकारण म्हणजे 1999ची पुनरावृत्ती होत आहे, असं चित्र दिसतंय. निवडणुकीच्या निकालात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरूनही मुखऱ्यमंत्रिपदाच्या मुद्यावरून एकत्र निवडणूक लढवलेल्या शिवसेनेबरोबर भाजपाचं फिस्कटलं. मुख्यमंत्री शिवसेनेचा या भूमिकेवर शिवसेना इतकी आग्रही राहिली की शेवटी भाजपाला एक पाऊल मागे घ्यावं लागलं.

आता या सगळ्या राजकीय नाट्यानंतर पुन्हा एकदा 1999ची पुनरावृत्ती होते, असं चित्र स्पष्ट दिसतंय. 1999 रोजी आघाडीनं संधी साधत मुख्यमंत्रिपद आपल्याकडे खेचून आणलं होतं. 1999 मध्ये राजकीय परिस्थितीही काहीशी अशीच झाली होती. 1999च्या निवडणुकीत शिवसेनेला 69 तर भाजपाला 56 जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी शिवसेनेकडून नारायण राणेंचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतं तर, भाजपकडून गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. 1999मध्ये भाजपने शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. परंतु, ही मागणी त्यावेळी बाळासाहेबांनी धुडकावून लावली. दरम्यान, शिवसेनेनं सरकार स्थापनेचे प्रयत्न केले. परंतु, या प्रयत्नांना यश काही आलं नाही. तिथे काँग्रेस-राष्ट्रवादीनं सूत्र हलवली. अपक्ष आमदारांना आपल्यासोबत घेऊन सरकार स्थापन केलं आणि विलासराव देशमुखांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

आता पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पण शिवसेनेला आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री कराचं आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी शिवसेना आग्रही आहे. भाजपकडे आता 105 आमदार आहेत तर, शिवसेनेकडे 56 आमदार तर आघाडीचं संख्याबळ 98 आहे आणि 28 अपक्ष आमदार आहेत. शिवसेनेना आघाडीसोबत गेल्यास एकूण संख्याबळ होत आहे. 154. म्हणजे एक नवं त्रिसुत्र आपल्याला पाहायला मिळेल. आता पुन्हा आघाडी 1999ची पुनरावृत्ती करते की संजय राऊत चाणक्यनिती वापरत उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न पूर्ण होणार हे ठरण्यासाठी आता फक्त काही तास राहिले आहेत.

SPCIAL REPORT: अवकाळी पावसानं बळीराजाला रडवलं; 2 हजार हेक्टरवरील पिकं भुईसपाट

Published by: Kranti Kanetkar
First published: November 11, 2019, 8:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading