मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाणार रिफायनरीवरून शिवसेनेत उभी फूट, कोकणातील राजकारण तापलं

नाणार रिफायनरीवरून शिवसेनेत उभी फूट, कोकणातील राजकारण तापलं

रिफायनरीवरून आता शिवसेनेतच दोन गट पडले आहेत . शिवसैनिकानी घेतलेल्या रिफायनरीच्या समर्थन मेळाव्याननंतर आता 1 मार्चला होणार महासभा

रिफायनरीवरून आता शिवसेनेतच दोन गट पडले आहेत . शिवसैनिकानी घेतलेल्या रिफायनरीच्या समर्थन मेळाव्याननंतर आता 1 मार्चला होणार महासभा

रिफायनरीवरून आता शिवसेनेतच दोन गट पडले आहेत . शिवसैनिकानी घेतलेल्या रिफायनरीच्या समर्थन मेळाव्याननंतर आता 1 मार्चला होणार महासभा

रत्नागिरी, 23 फेब्रुवारी - कोकणच्या विकासासाठी रिफायनरी अशी जाहिरात सामनात छापून आल्यानंतर रिफायनरीवरुन कोकणात पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं नाणार रिफायनरीचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज ग्रीन रिफायनरी असं करण्यात आलं आहे. त्यासोबतच रिफायनरीला आपली जमीन देण्यास तयार असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संमतीपत्रासह रिफायनरीच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्यात आली आहेत. यामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेनं याला प्रत्यूत्तर म्हणून 1 मार्चला रिफायनरी विरोधातील महासभेचं आयोजन केलं आहे. दरम्यान, रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या 22 शाखाप्रमुखांसह एकूण 26 पदाधिकाऱ्यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यामुळे नाणार रिफायनरीवरुन आता शिवसेनेत उघड उघड दोन गट पडले आहेत.

रिफायनरीबाबतचे काय आहेत दावे-प्रतिदावे - 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या नाणार रिफायनरीची अधिसूचना रद्द करणं ही भाजप-शिवसेना युती होण्यातील अनेक महत्वाच्या अटींपैकी शिवसेनेची एक अट होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अधिसूचना रद्द केली आहे. मात्र ही अधिसूचना रद्द होईपर्यंत या प्रस्तावीत रिफायनरी क्षेत्रातल्या हजारो एकर जमीनीची खाजगी एजंटांकरवी खरेदी झालेली आहे. आता रिफायनरीसाठी ही जागा देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र अधिसूचनाच रद्द झाल्यामुळे या प्रकल्पाची नव्याने अधिसूचना काढणं गरजेचं आहे. सामनात छापून आलेली जाहिरात ही त्यादृष्टीनं लोकांचा कल बघण्यासाठी केलेली चाचपणी होती का? असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान या रिफायनरीसाठी आवश्यक असलेल्या किमान 10 हजार एकर जमिनीपैकी 7 हजार एकरला 1500 शेतकऱ्यांनी आपल्या अडीच हजार सातबारांसह आपल्याकडे संमती दिली असल्याचा दावा कोकण जनकल्याण प्रतिष्ठाननं केला आहे. या दाव्यालाच शिवसेनेचा आक्षेप आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या प्रतिक्रीयेत असं स्पष्ट केलं आहे की, जी काही अडीच तीन हजार एकर जागेची खरेदी खाजगी व्यापाऱ्यांकडून झालेली आहे त्यात सुमारे 220 खरेदीदार गुजरातचे भूमाफिया आहेत. हे भूमाफिया स्थानिक एजंटाना हाताशी धरुन समर्थनाचं आंदोलन चालवीत असून त्याला शिवसेनेचे काही पदाधिकारीही बळी पडल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यानी केला आहे. त्यामुळे या सगळ्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी येत्या एक मार्चला शिवसेना आणि कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितिच्या वतीने नाणार परिसरात रिफायनरीविरोधात पुन्हा एकदा महासभा घेण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे.

रिफायनरीवरून शिवसेनेत दुफळी - राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी हे खरं तर शिवसेनेचे निष्ठावान आमदार. पण तीन वेळा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून येऊनही साळवींना बाजूला ठेवत शिवसेनेने राष्ट्रवादीतून आलेल्या उदय सामंत याना झुकतं माप देत महामंडळही दिलं आणि कॅबिनेट मंत्रीही केलं. त्यामुळे साहजिकच राजन साळवी एका बाजूला तर उदय सामंत आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यात बरंच काही बिनसलं आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यात सामनातली जाहिरात घेऊन रिफायनरीचं उघड समर्थन करत त्यांची भेट घेणाऱ्यात शिवसेनेचे पाच पदाधिकारी होते. त्यामुळे खासदार राऊत यांनी ही संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली. यातले बरेचसे पदाधिकारी हे आमदार राजन साळवी यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे आता एकीकडे आमदार ऱाजन साळवी आणि दुसऱ्या बाजूला खासदार विनायक राऊतांसह मंत्री उदय सामंत असा सामना रंगणार आहे. त्यातच रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या 22 शाखा प्रमुखांनी राजीनामे दिल्यामुळे सेना नेत्यांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.

First published:
top videos

    Tags: Konkan, Nanar