लॉकडाऊनमध्ये पोलीसच करतोय अवैध प्रवासी वाहतूक, पत्रकारांनी हटकल्यावर केली दमदाटी

लॉकडाऊनमध्ये पोलीसच करतोय अवैध प्रवासी वाहतूक, पत्रकारांनी हटकल्यावर केली दमदाटी

पोलीस कॉन्स्टेबल 10 ते 15 प्रवाशांना कोंबून राँग साईडने प्रवास करत होता.

  • Share this:

जुन्नर, 30 मार्च : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा इथे पुण्यावरून मारुती ओमिनी (क्रमांक MH15 11 DC 1146) या कारमध्ये एक बोडके नावाचा पोलीस कॉन्स्टेबल 10 ते 15 प्रवाशांना कोंबून राँग साईडने प्रवास करत होता. विशेष म्हणजे आळेफाटा इथे काही जागृत पत्रकारांनी हा प्रकार उघड केल्यावरही स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करून या पोलिसाला उलट मदत केली आणि त्याची कार आणि आतील प्रवासी सोडून दिले.

एकीकडे लॉकडाऊन असताना आणि काही नागरिक याच मार्गाने पायी प्रवास करत असताना अशा पद्धतीने जेव्हा पोलीस चूक करत असतील आणि या पोलिसांना पोलीस मदत करत असतील तर काय सुव्यवस्थेचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.वपत्रकारांनी जर असं काही केलं तर दंडुका उगारला जातो, मग अशा नियम मोडणाऱ्या पोलिसाला उपस्थित पोलिसांनी मोकळं कसं सोडलं? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

हिंगोलीतही समोर आला विचित्र प्रकार

आपण सगळे 'कोरोना व्हायरस'रुपी महाभयंकर संकटाचा सामना करत आहोत. या काळात पोलिसांच्या कामगिरीचं कौतूक होत आहे. त्यांना सहकार्य करा, असं आवाहन केलं जात आहे. मात्र, हिंगोलीला नुकताच पोलिसांचा क्रूर चेहरा समोर आला आहे. वार्तांकनासाठी गेलेले 'न्यूज18 लोकमत'चे हिंगोलीचे प्रतिनिधी कन्हैय्या खंडेलवाल यांना एका पोलीस उपनिरीक्षकाने बेदम मारहाण केली आहे. यात गंभीर जखमी झालेले कन्हैय्या यांच्यावर सध्या हिंगोलीतील एका हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत.

कन्हैया खंडेलवाल हे वार्तांकनासाठी जात असताना रस्त्यावर पोलीस सामान्य नागरिकांनी मारहाण करत होते. सामान्यांना मारहाण करु नका, असे शासनाचे आदेश असताना कन्हैया यांनी पोलिसांना जाब विचारला. याचा राग आल्याने आमच्याविरोधात बातम्या करतो काय, असं म्हणत एपीआय चिंचोळकर यांनी कन्हैया यांच्या कानशिलावर पिस्तूल रोखलं. आता तुला जिवंत ठेवणार नाही. माझे कुणीच काही करणार नाही, म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. रस्त्यावर बेदम मारहाण करून पोलीस थांबले नाहीत. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तिथंही मारहाण केली.

कन्हैया यांच्यावर पोलिसांनी केलेल्या भ्याड हल्ल्यांचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. सरकारने अशा मस्तवाल पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि लेखणीला न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

First published: March 30, 2020, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading