Home /News /maharashtra /

सर्वसामान्य जनतेला सुद्धा मोफत लस द्यावी, आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

सर्वसामान्य जनतेला सुद्धा मोफत लस द्यावी, आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

'केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये मोफत लस देण्याची मागणी केली...

उस्मानाबाद, 17 जानेवारी : कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी देशभरात लसीकरण (corona vaccine) सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुद्धा मोफत लस द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील कळंब येथे एका हॉस्पिटलचे उद्घाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी लसीकरणाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. 'मम्मी गेल्यामुळे पप्पा बेल्टाने खूप मारतात', दोन चिमुरड्यांना अमानुष मारहाण 'कोरोना लसीकरणासाठी केंद्राकडून चांगले सहकार्य मिळत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यानंतर सर्वसामान्य लोकांना देखील मोफत लस द्यावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. 'केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये मोफत लस देण्याची मागणी केली असून या लशीच्या संपूर्ण खर्चाचा भार हा केंद्र सरकारने उचलावा', अशी चर्चा झाल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. कोर्टाच्या आदेशानंतर RSS घेणार जमीन ताब्यात, ‘या’ शहरात संचारबंदी! 'मोफत लस द्यावी अशी मागणी करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. कोव्हिन अॅपच्या तांत्रिक त्रुटीमुळे लसीकरणाच्या पहिल्या दिवशी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे पहिल्या दिवशीच 100 टक्के लसीकरण होवू शकले नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. 'यापुढे राज्यात आठवड्यातून चार दिवस लसीकरण केले जाणार आहे. लवकरच बाजारामध्ये 5 ते 6 लशी येणार आहे. त्यामुळे खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये लस उपलब्ध असणार आहे त्यामुळे लसीचा तुटवडा होणार नाही', अशी माहितीही टोपे यांनी दिली.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या