मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /काळाने घात केला, मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना झालेल्या अपघातात आई-वडील जागीच ठार

काळाने घात केला, मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना झालेल्या अपघातात आई-वडील जागीच ठार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन गावाकडे परतताना अपघात होऊन पती- पत्नी जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली.

बीदर, 2 डिसेंबर: मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन गावाकडे परतताना अपघात होऊन पती- पत्नी जागीच ठार झाल्याची दुर्घटना बुधवारी रात्री बीदर - उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ घडली. सूर्यकांत पाटील (50) व जयश्री पाटील (45, रा. मेथी मेलकंदावाडी, हमु. भालकी, जि. बीदर) असे अपघातात मयत झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे.

सूर्यकांत पाटील यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या विवाहाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी सूर्यकांत पाटील व त्यांची पत्नी जयश्री पाटील हे दोघे बुधवारी बिदरला गेले होते. तिथे पत्रिका वाटप करुन रात्री उशिरा भालकीकडे परतत होते. तेव्हा बीदर- उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ त्यांची जीप उलटून अपघात झाला. त्यात दोघेही जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती समजताच भालकीचे आमदार ईश्वर खंड्रे व पोलीस अधिका-यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयत दोघांवरही मेथी मेलकुंडा वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सूर्यकांत पाटील हे ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व भावंडे असा परिवार आहे.

First published:

Tags: Accident, Karnataka, Wedding