पान टपरीच्या गल्ल्यातील पैसे चोरतो म्हणून मालकानंच केला कामगाराचा गेम अन्.....

पान टपरीच्या गल्ल्यातील पैसे चोरतो म्हणून मालकानंच केला कामगाराचा गेम अन्.....

पान टपरीवर कामगार पैसे चोरतो या संशयावरून मालकानं त्याचा खून केला. एवढंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी कामगाराचा मृतदेह फेकला तलावात...

  • Share this:

डोंबिवली, 27 ऑगस्ट: पान टपरीवर कामगार पैसे चोरतो या संशयावरून मालकानं त्याचा खून केला. एवढंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी कामगाराचा मृतदेह तलावात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करून क्राईम ब्रँचने मारेकरी मालकाच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा...महाड दुर्घटनेत बचावलेल्या 4 वर्षीय मुलांचं एकनाथ शिंदेंनी स्विकारलं पालकत्त्व

क्राईम ब्रँचनं या अत्यंत किचकट व गंभीर स्वरूपाचा खुनाचा भंडाफोड केला. या गुन्ह्यात आणखी दोघांचा समावेश असून पोलिस त्यांच्याही मागावर आहेत.

मिळालेली माहितीनुसार, सुनील श्रीराजवा पटेल (28, रा. पांडुरंग वझे कम्पाऊंड, ललीत काट्याजवळ, मानपाडा) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीला शुक्रवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली आहे.

कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या क्लासिक हॉटेलच्या पान टपरीवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणादरम्यान त्यातील एकाला ठार मारल्याची माहिती कळताच क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूपण दायमा, फौजदार नितीन मुदगुन, हवा. दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, विलास मालशेटे, राजेंद्र खिलारे, अरविंद पवार, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, हरिश्चंद्र बंगारा, बाळा पाटील, अजित राजपुत, राहूल ईशी या पथकाने तपासचक्रांना वेग देऊन शोध मोहीम सुरू केली.

धक्कादायक माहिती समोर...

या पथकाने सुनील पटेल याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता त्याने धक्कादायक माहिती उघड केली. सुनील पटेल याने स्वत: त्याच्या इतर दोन कामगारांसह टपरीवर काम करणारा कामगार सुरीज स्वरूपवा पाल (18, मूळचा रा. ग्राम भदेहदू तह. बबेरू, जि. वादा, उत्तरप्रदेश) याला शुक्रवारी दुपारी 2 ते साडेतीन दरम्यान दरम्यान पानटपरीच्या गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर लाकडी दांडका, गॅस पाईप व कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच डोके जमीन व भिंतीवर आदळून ठार मारले. त्यानंतर सुरीजचा मृतदेह गोणपाटात भरून त्याच क्लासिक हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या दलदलयुक्त तलावात फेकून दिला.

हेही वाचा...विघ्नेश्वर गणपतीचे चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात, दीड किलोची चांदीची छत्री जप्त

सुनील पटेल याने अन्य दोन साथीदारांसह सुरीज पाल याला ठार मारल्याची कबूली दिली. या माहितीनुसार मानपाडा पोलिसांसह घटनास्थळी तलावात उतरून पाण्यात मृतदेह शोध घेत असतानाच सदर तलावाच्या उत्तर दिशेच्या काठाजवळ दलदलीत लाकडी प्लायवूडच्या खाली एक गोणी आढळून आली. सदर गोणपाटात बांधलेला मृतदेह सुरीज पाल याचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सुरीजचा मृतदेह केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलकडे पाठवून दिला. या गुन्ह्याचा अधिक तपास स्थानिक मानपाडा पोलिसांनी सुरू केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 27, 2020, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading