मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

st bus strike : कोर्टाच्या आदेश पायदळी तुडवला, संपकऱ्यांनी ST कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण

st bus strike : कोर्टाच्या आदेश पायदळी तुडवला, संपकऱ्यांनी ST कर्मचाऱ्याला केली बेदम मारहाण

 संप सुरू असताना बस पुण्याला घेऊन का गेला? अशी संपकऱ्यांनी विचारणा केली म्हणून वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांना मारहाण...

संप सुरू असताना बस पुण्याला घेऊन का गेला? अशी संपकऱ्यांनी विचारणा केली म्हणून वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांना मारहाण...

संप सुरू असताना बस पुण्याला घेऊन का गेला? अशी संपकऱ्यांनी विचारणा केली म्हणून वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांना मारहाण...

सातारा, 16 नोव्हेंबर : एसटी महामंडळ सरकारमध्ये विलगीकरण घेण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे (st bus strike maharashtra)  मागील दोन आठवड्यांपासून संप सुरूच आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर जायचे त्यांना जाऊ द्या, असे हायकोर्टाने (mumbai high court) आदेश दिले आहे. पण, या आदेशाची पायमल्ली आज साताऱ्यात (satara) झाली. साताऱ्यात एका एसटी कर्मचाऱ्याला संपकरी कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केली.

सातारा बसस्थानकात एसटी कर्मचाऱ्यांची तुंबळ मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सातारा वाहतूक नियंत्रक अमित चिकणे गंभीर जखमी झाले आहेत. संप सुरू असताना बस पुण्याला घेऊन का गेला? अशी संपकऱ्यांनी विचारणा केली म्हणून किरकोळ बाचाबाची झाली आणि त्यानंतर या वादातून अमित चिकणे यांच्या डोक्यात संपातील एसटी कर्मचारी राजू पवार याने डोक्यात दगड घातला. यामध्ये वाहतूक नियंत्रक अमित चिकणे गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

येत्या 5 दिवसात कोकण-मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस; पुण्यासह मुंबईतही हाय अलर्ट

सातारा पोलिसांनी हल्ला करणाऱ्य राजू पवार याला ताब्यात घेतले आहे. साताऱ्यात झालेल्या या मारामारीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

एकच नंबर! Corona Vaccination मध्ये मुंबई पालिकेनं गाठला विक्रम

दरम्यान, सोमवारीच हायकोर्टाने एसटी कर्मचारी संघटनेला फटकारून काढले होते. दरम्यान, सोमवारीच हायकोर्टाने एसटी कर्मचारी संघटनेला फटकारून काढले होते.  'ज्या कर्मचाऱ्यांना कामावर जायचं आहे त्यांना जाऊ द्या. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या घोषणा करू नये, वैयक्तिक घोषणा देऊ नयेत. ज्या बसेस सुरू आहेत त्यांनाही आंदोलकांनी त्रास देऊ नये' असं म्हणत हायकोर्टाने (mumbai high court) एसटी कर्मचारी संघटनेला फटकारून काढले होते. तसंच, समितीसोबत चर्चा करण्याचे आदेशही दिले. पण, तरीही एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहे. आता पुढील सुनावणी 22 नोव्हेंबरला होणार आहे.

First published:

Tags: Satara