अखेर कांदा लिलाव सुरू होणार, सणा-सुदीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा

अखेर कांदा लिलाव सुरू होणार, सणा-सुदीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा

साठेबाजी होऊ नये म्हणून केंद्र सरकारने जास्त प्रमाणात कांदा साठवून ठेवण्यास बंदी घातली होती. व्यापाऱ्यांनी त्याचा विरोध केला होता.

  • Share this:

नाशिक 29 ऑक्टोबर: कांद्याच्या साठवणुकीच्या प्रश्नावर केंद्र सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर अखेर कांद्याचे लिलाव सुरू करण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शवली. तर केंद्रानेही काही नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे आता शुक्रवारपासून कांद्याचे लिलाव सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ऐन सणा सुदीच्या काळात लिलाव बंद झाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती.

मुंबईत आज कांदा व्यापारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली होती. तर दिल्लीतही व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू होती. साठवणुकीची मर्यादा कायम ठेवली. त्यात बदल करणार नसल्याचं सांगितलं. मात्र खरेदी विक्रीसाठी 3 दिवसांची मुदत मिळणार आहे. त्यामुळे देशांतर्गत, कांदा ट्रान्सपोर्टेशन करीता मोठा दिलासा मिळाला आहे.

साठेबाजी होऊ नये म्हणून केंद्र सरकारने जास्त प्रमाणात कांदा साठवून ठेवण्यास बंदी घातली होती. व्यापाऱ्यांनी त्याचा विरोध केला होता. खासदार भारती पवार यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली होती.

कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता कांद्याच्या बियाणे निर्यातीवरही केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला. त्यात बियाण्याचंही मोठं नुकसान झालं. त्यामुळे देशात कांदा बियाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तातडीने हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

BREAKING : पुणेकरांचा श्वास मोकळा; 1 नोव्हेंबरपासून उद्यानं नव्या अटींसह खुली

कांद्याचे भाव वाढल्याने सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतरही भाव फारसे आटोक्यात आले नाहीत. नंतर परदेशातूनही कांदा आयात केला गेला. आता कांद्यांच्या बियाण्यांचीही टंचाई निर्माण झाली आहे. 1 हजार रुपये किलो असलेलं बियाण्याचे भाव 4 हजारांपर्यंत गेले आहेत.

त्यामुळे कांदा लागवडीसाठी बियाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पोळ लाल, रांगडा आणि उन्हाळा असा तीन प्रकारचा कांदा असतो. वर्षातून तीन वेळा कांद्याचं पीक घेतलं जातं. मे-जुन, ऑगस्ट-सप्टेबर, जानेवारी-फेब्रुवारी या दरम्यान कांद्याची लागवड केली जाते. निर्यातबंदी केल्याने बियाण्यांच्या भावावर नियंत्रण येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

याला म्हणतात परिवर्तन.. 20 वर्षांपासून सुरु असलेल्या बिअर बारचं झालं हॉस्पिटल

सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा (Onion Import from Afghanistan) निर्णय घेतला आहे. यामुळे कांद्याच्या वाढत्या किंमतीतून सामान्यांना काहीसा दिलासा मिळेल. हा कांदा अफगाणिस्तानमधून खरेदी केला जाणार आहे. सरकारच्या योजनेनुसार दररोज 4000 टन कांदा भारतात येणार आहे. CNBC आवाजने याबाबत माहिती दिली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 29, 2020, 9:24 PM IST
Tags: onion

ताज्या बातम्या