अमरावती,6 मार्च: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजुरी मिळालेला समृद्धी महामार्ग अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडश्वेवर तालुक्यातील वाढोना रामनाथ या गावातील एका वृद्ध शेतकऱ्याने समृद्धी महामार्गात जमीन चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. माझी शेतजमीन परत करावी किंवा मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. मागील एक वर्षापासून न्याय न मिळाल्याने या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
हेही वाचा...अजित पवारांना दणका, माळेगाव साखर कारखाना जिंकूनही महिनाभर राहावे लागणार बाहेरकाय आहे प्रकरण?
सीताराम कंटाळे असं 65 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. सीताराम कंटाळे यांच्याकडे दोन ठिकाणी एकूण अडीच एकर ओलिताची शेतजमीन होती. त्यापैकी समृद्धी महामार्गासाठी एका शेतातील 41 आर पैकी 24 आर शेतजमीन तत्कालीन राज्य सरकारकडून अधिग्रहित करण्यात आले होती. तर दुसऱ्या शेतातील 43 आर जमीन अधिग्रहण केली होती. दरम्यान दोन्ही शेत अधिग्रहित झाल्यानंतर सीताराम कंटाळे यांच्याकडे 51 आर जमीन शिल्लक राहणे अपेक्षित होते. परंतु कंटाळे यांच्याकडे फक्त 25 आर जमीन शिल्लक आहे. त्यामुळे माझी 26 आर जमीन समृद्धी महामार्गाने चोरल्याचे धक्कादायक आरोप सीताराम कंटाळे यांनी केला आहे. एक तर माझी उर्वरित शेतजमीन परत करावी किंवा मोबदला द्यावा, अशी मागणी कंटाळे यांनी केली आहे. दरम्यान, सीताराम कंटाळे यांना एक वर्षपासून न्याय न मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
हेही वाचा...
वर्षा बंगल्याच्या भिंतीवरच्या 'त्या' मजकुराबद्दल अमृता फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण10 रुपये किलो दर करुनही मिळेना ग्राहक, अखेर जंगलात सोडल्या कोंबड्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.