कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय; 'या' जिल्ह्यात संचारबंदीची घोषणा

कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय; 'या' जिल्ह्यात संचारबंदीची घोषणा

सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोना पुन्हा बळावत असल्याचं चित्र आहे

  • Share this:

वाशिम, 20 फेब्रुवारी : राज्यात कोरोनाचा कहर पुन्हा वाढत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत आटोक्यात असलेली रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये कडक निर्बंध करण्यात आले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान वाशिममध्ये आजपासून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.

संचारबंदीत रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, ऑटोरिक्षा, हायवेवरील पेट्रोलपंप व ढाबे एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग वगळता सर्व दुकाने व आस्थापना सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याशिवाय आठवडी बाजार, गुरांचे बाजारदेखील बंद करण्यात आले आहे. लग्न समारंभासाठीही पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे.

हे ही वाचा-शिमग्याला काही दिवस बाकी असताना कोकणात कोरोनाचं सावट, खेड ठरतंय नवा हॉटस्पॉट!

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Corona virus) प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुमारे 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस मुंबईसाठी खूप महत्त्वाचे असतील, असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. नागरिकांवर निर्बंध आणण्यासाठी मुंबई प्रशासनानेही कंबर कसली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: February 20, 2021, 7:41 PM IST

ताज्या बातम्या