पुण्याजवळील या तालुक्याची मुंबईकरांनी उडवली झोप, कोरोना रुग्णांमध्ये वाढ

पुण्याजवळील या तालुक्याची मुंबईकरांनी उडवली झोप, कोरोना रुग्णांमध्ये वाढ

गेली दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याची अखेर मुंबईकरांनी झोप उडवली आहे.

  • Share this:

आंबेगाव, 29 मे : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्पात शिथिलता आणली गेली आणि शहरातील अनेकांनी आपल्या गावाचा रस्ता धरला. मात्र याचा परिणाम असा झाला की आतापर्यंत कोरोनापासून दूर असलेल्या गावांमध्ये प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. गेली दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याची अखेर मुंबईकरांनी झोप उडवली आहे.

आंबेगावमध्ये आज एकाच दिवसात तब्बल 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून हे सर्व रूग्ण मुंबईवरून आलेले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वडगाव काशिंबेग येथील एकाच कुटुंबातील 7 जण आहेत, तर फदालेवाडी येथे 3, पेठ येथे-2, शिनोली येथे-1 , घोडेगाव येथे-1 आणि एकलहरे येथे-2 असे एकाच दिवसात तब्बल 15 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 24 वरती पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा सर्व भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. तसंच हा परिसर सील करण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

नगरमध्येही वाढू लागली कोरोनाबाधितांची संख्या

अहमदनगर जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातून आलेल्या कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले 1, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला 1, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला 1 संगमनेर 2, निमगाव (राहाता) येथील 4 जणांचा समावेश आहे.

First published: May 29, 2020, 11:22 PM IST

ताज्या बातम्या