जालना, 28 मे : सोशल डिस्टन्सिंगच्या नियम पायदळी तुडवित रस्त्यांवर विनाकारण वर्दळ आणि गर्दी करणे जालनेकरांच्या चांगल्याचे अंगलट येत असून शहरात कोरोनाने शंभरी पार केली आहे. आज आढळलेल्या नव्या 24 रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अखेर 110 वर जाऊन पोहोचला आहे.
रात्री उशिरा आलेल्या वैद्यकीय अहवालात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जालन्यातील आकडा 85 वर येऊन पोहोचल्याने कोरोनाने शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू केली होती. परंतु, अवघ्या काही तासातच प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालात तब्बल 24 नवीन रुग्णांची भर पडल्याने जालना जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा थेट 110 वर जाऊन पोहोचला आहे.
हेही वाचा -पुण्यातील HRची कमाल! लॉकडाऊनमध्ये साताऱ्यातील 'हे' गाव केलं पाणीदार
आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांपैकी अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील 6, अंबड येथील शारदानगरमधील 5, बदनापूर तालुक्यातील कातखेडा येथील 1, राज्य राखीव पोलिस दलातील 1, बदनापूरमधील 1 आणि कोविड केअर सेंटरमधील 6 जणांचा समावेश आहे.
हेही वाचा - मौन सोडा जनतेसाठी बोला, प्रियांका गांधींची मोदींवर टीका; फडणवीसांनाही सुनावलं
जालन्यात लॉकडाउनला शिथिल केल्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर लोकांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंग पायदळी तुडवत बाजारात तोबा गर्दी करत त्यामुळे जालनेकरांना हे महागात पडणार असल्याचं स्पष्ट जाणवतंय.
दरम्यान, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आता तरी याप्रकाराची गांभीर्याने दखल घेत लोकहितासाठी लॉकडाउनची शिथिलता मागे घेत कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.