कल्याण, 10 डिसेंबर : धावत्या लोकलमध्ये (kalyan local train) एका नवजात बाळाला (new born baby) प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून सोडणाऱ्या महिलेला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याण क्राईम ब्रांचच्या (kalyan police) युनिट 3 ने महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ही महिला या नवजात बाळाची आई आहे. मात्र, अविवाहित असतांना तिला मुलं झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिटवाळा रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये एका पिशवीत नवजात बाळ आढळून आले होते. कल्याण जीआरपीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, मात्र कल्याण क्राईम रेल्वे ब्रांचही याचा समांतर तपास करीत होते. याच वेळी सीसीटीव्हीच्या मदतीने बाळाला सोडणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.अनैतिक संबंधातून हे मुल जन्माला आले होते त्याचे पालकत्व लपवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं कबुल केलं आहे.
BREAKING : महाराष्ट्रात Omicron चा धोका वाढला, रुग्ण संख्या पोहोचली 17 वर!
कल्याण रेल्वे क्राईम ब्राँचच्या दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी टिटवाळ्याहून निघालेल्या एका लोकलमध्ये महिलांच्या एका डब्यातील सीटवर प्लास्टिक पिशवी आणि त्याच्या आत कपड्यात गुंडाळलेले नवजात बाळ आढळून आले होते. याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना देण्यात आली. त्यांनतर कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी येत हे बाळ ताब्यात घेत पंचनामा केला. कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कल्याण जीआरपीसह कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे यावेळी पोलिसांनी तपासून पाहिले. यावेळी एक महिला कोपर रेल्वे स्थानकातून (kopar railway station ) टिटवाळा जाणाऱ्या लोकलमध्ये बसली होती, प्लॅटफॉर्मवर ती आली असता त्याच्या हातात प्लॉस्टिकची पिशवी होती. ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होती. विशेष म्हणजे, ज्या पिशवीत टिटवाळा स्थानकात लोकल आली असता जे बाळा आढळून आलं होतं. ती पिशवी आणि या महिलेच्या हातातील पिशवी एकसारखीच दिसत असल्यानं पोलिसांचा संशय बळावला. यावेळी पोलिसांनी तिचा शोध घेत तिला ताब्यात घेतले.
समीर वानखेडेंवर आरोप प्रकरणी मलिक यांनी कोर्टात मागितली माफी, म्हणाले...
यावेळी ज्या व्यक्तीपासून तिला हे बाळा झाले होते त्याला देखील ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, कल्याण रेल्वे पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल, यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. सी.शेख, पोलीस उपनिरीक्षक साळवी,पोलीस उपनिरीक्षक जावळे,पोलीस हवालदार दिवटे, पुलेकर,भोजने,रासकर,दरेकर,कर्डीले,माने,मागाडे, तावडे,सुरवसे, पाटील तसंच तांत्रिक विभागाचे चावरेकर, राठोड आणि निंबाळकर यांनी या गुन्ह्याची उलघडा करण्यात विशेष मेहनत घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: कल्याण