• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • राष्ट्रवादीच्या नेत्याने आपल्याच नेत्याविरोधात ईडीकडे केली तक्रार, पंढरपुरात खळबळ

राष्ट्रवादीच्या नेत्याने आपल्याच नेत्याविरोधात ईडीकडे केली तक्रार, पंढरपुरात खळबळ

 पंढरपूरमधील (pandharpur) राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहे.

पंढरपूरमधील (pandharpur) राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहे.

पंढरपूरमधील (pandharpur) राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहे.

  • Share this:
पंढरपूर, 29 ऑक्टोबर :  एकीकडे ईडीच्या (ed)  कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारमधील (mva government) मंत्री आणि आमदारांची पुरती डोकेदुखी वाढली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या (ncp) नेत्यानेच आता आपल्या पक्षातील नेत्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल केली आहे.  पंढरपूरमधील (pandharpur) राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याण काळे (kalyan kale) यांनी विक्री केलेल्या सीताराम साखर कारखान्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष ॲड. दीपक पवार (deepak pawar) यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्यामध्ये कल्याण काळे यांच्यासह संचालक व कार्यकारी संचालक यांनी हजारो लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे, असा आरोप पवार यांनी केला आहे. VIDEO - विमानात 'पायलट बाबू'चा बिहारी अंदाज; भोजपुरीत स्वागत करताच प्रवाशांनी... 2010 ते 2015 या दरम्यान सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे ऊस दिलेल्या शेतकरी, कामगार, ट्रॅक्टर मालक, व्यापारी व शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून शेअर्स देतो म्हणून सुमारे 35 कोटी रुपये गोळा केले आहेत. हे पैसे घेतल्यानंतर अनेकांना पावत्याही दिल्या नाहीत, असा आरोप पवार यांनी केला आहे. वडिलांच्या मृतदेहासोबत मुलीचं हॉट Photo Shoot; सोशल मीडियावरही केले शेअर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडून शेअर्सपोटी पैसे गोळा केले आहेत. परंतु, फक्त वाडीकुरोली, पिराचीकुरोली आणि धोंडेवाडी या तीन गावातील 4 हजार 952 शेतकऱ्यांची नावे शेअर्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अन्य शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशाचे काय? त्यांची नावे का नाहीत ? यांनी भरलेली रक्कम कुठे गेली? याची चौकशी करण्याची मागणी ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडे केली आहे. तसंच पोलिसांकडे तक्रार ही दाखल केली आहे.
Published by:sachin Salve
First published: