...तर सातारा नाव दिसलं नसतं, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा अहेर

...तर सातारा नाव दिसलं नसतं, उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा अहेर

बारामतीच्या दिशेने हात करून जो ब्रेन आहे ना त्यांनी खासदारकीला उभं राहावं. या जिल्ह्यात त्यांनी भांडणे लावण्यापलिकडे काहीच केले नाही.

  • Share this:

सातारा, 16 जून : सातारा हा जिल्हा ठेवायचा नव्हता तो बारामतीला जोडायचा प्लॅन होता, बारामती जिल्हा आणि कराड जिल्हा, तुम्हाला मग सातारा नावचं दिसले नसते असं नाव न घेता राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीनी शरद पवारांना टोला लगावत पक्षालाच घरचा अहेर दिला.

नेहमी आपल्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी त्याचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन टीका केली. सातारा नगरपालिकेचा कारभरावरून दोघात चांगलीच जुंपली आहे. यावेळी बोलताना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा देखील त्याचा स्टाईलमध्ये खरपूस समाचार घेतला आहे.

माझ्या कॉलरवर बोलायचंय तर समोर येऊन बोला -उदयनराजे भोसले

रयत ही संस्था राहिली नसून ती एक खाजगी इन्स्टीट्युट झालीय. जर शिवेंद्रला संस्थेत घेतलं असतं तर त्यांच्या जशा संस्था डब्यात गेल्यात तशीच रयतही डब्यात गेली असती. असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे बधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केलीये.

VIDEO...आणि म्हणून उदयनराजे कॉलर उडवतात

त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आपल्याच पक्षाकडे वळवला. मी नसतो तर साताऱ्यातील अनेक ऑफिस हे बारामतीला गेले असते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना सातारा जिल्हा ठेवायचा नव्हता तो बारामतीला जोडायचा प्लॅन होता. बारामती जिल्हा आणि कराड जिल्हा... तुम्हाला सातारा नावचं दिसलले नसते असं नाव न घेता उदयनराजेंनी शरद पवारांना टोला लगावला.

माझ्यापुढे सर्वांच्या काॅलर खाली येतात,शरद पवारांचा उदयनराजेंना टोला

मग म्हणायचे पक्षाला घरचा अहेर तुम्हा जर आमच्या तोंडाचा घास हिसकावत असाल तर कोण गप्प बसणार बाकीचे गप्प बसतील मी गप्प बसणार नाही असा इशाराही उदयनराजेंनी दिला.

दुसऱ्यांवर चिखलफेक करायला अक्कल लागत नाही. लोकांची काम करुन घ्यायला अक्कल लागते. सर्व जाहीरनामे काढून समोर बसा मी सगळी काम खट्ट केली. यांचे संकोचित विचार असतील तर त्यात माझा दोष नाही असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.

राजेशाही असती तर बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असता-उदयनराजे भोसले

'अभिजीत बिचूकलेला घाबरतो'

बारामतीच्या दिशेने हात करून जो ब्रेन आहे ना त्यांनी खासदारकीला उभं राहावं. या जिल्ह्यात त्यांनी भांडणे लावण्यापलिकडे काहीच केले नाही. मी फक्त एकालाच घाबरतो तो म्हणजे अभिजीत बिचूकलेला असंही उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये सांगितलं.

First published: June 16, 2018, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading