ताडोबातील त्या 3 वाघांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, समोर आली धक्कादायक माहिती

ताडोबातील त्या 3 वाघांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, समोर आली धक्कादायक माहिती

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सीतारामपेठ गावाशेजारी मृत्युमुखी पडलेल्या 3 वाघांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं आहे.

  • Share this:

हैदर शेख(प्रतिनिधी),

चंद्रपूर, 17 जून: जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सीतारामपेठ गावाशेजारी मृत्युमुखी पडलेल्या 3 वाघांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं आहे. गावकऱ्यांनी विषप्रयोग करून तिन्ही वाघांना मारल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

हेही वाचा... मोठी बातमी: सुशांत सिंह राजपूतबाबत कमाल खान लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट!

परिसरातील कोंडेगाव येथील तीन ग्रामस्थांनी विषप्रयोग करून या वाघांना मारल्याचे स्पष्ट झालं आहे. गावाशेजारी असलेल्या मोह फुलाच्या अवैध दारू अड्ड्यापाशी सतत येणारी ही वाघीण व तिचे बछडे या आरोपींनी विषप्रयोग करून संपविल्याचे तपासात धक्कादायक निष्पन्न झालं आहे. फेब्रुवारीपासून विदर्भातील जंगलात मोह फुलांचा हंगाम सुरू होतो. त्यासोबतच दारू गाळण्याचे अवैध अड्डे देखील जंगलात सुरू होतात.

यंदा दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कठोर लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी दारूची तस्करी कमी झाली. त्यामुळे  स्थानिक मोह फुलाच्या दारूची मागणी वाढली. अशातच कोंडेगाव तलाव परिसरात आरोपींनी तयार केलेल्या मोह फुलाच्या दारू अड्ड्यापाशी ही वाघीण रोज येत असे. तिचा व बछड्यांचा काटा काढून हा भाग दहशत मुक्त करण्याच्या उद्देशाने तीन आरोपींनी मृत रानडुकरावर आधीच विषारी पावडर टाकून ठेवली होती. वाघीण व बछड्यानी हेच रानडुक्कर खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा...बापरे! भारतातल्या कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 100 देशांपेक्षाही जास्त

वाघिणीचा मृतदेह 10 जून रोजी तर बछड्यांचा मृतदेह 14 जून रोजी वनविभागाच्या गस्ती दरम्यान आढळला होता. दरम्यान व्हिसेराचे नमुने हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट झाले होते. वनविभागाने वेगवेगळी तपास पथके तयार करून आरोपींचा कसून शोध सुरू होता. यात कोंडेगाव येथील 3 आरोपींनी हा विषप्रयोग केल्याचे निष्पन्न झाले आहे. सूर्यभान ठाकरे, श्रवण मडावी, नरेंद्र दडमल अशी आरोपींची नावे आहेत.

First published: June 17, 2020, 8:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading