नगरमध्ये व्याजाच्या पैशातून तरुणांची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या

नगरमध्ये व्याजाच्या पैशातून तरुणांची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या

व्याजाच्या पैशातून तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शहरातील नगर-मनमाड मार्गावरील पद्मावती पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 21 जून- व्याजाच्या पैशातून तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शहरातील नगर-मनमाड मार्गावरील पद्मावती पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. योगेश इथापे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोराने त्याच्यावर कोयत्याने वार केले होते. त्याला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु, योगेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दुसरीकडे, आरोपी कृष्णा गायकवाड याने स्वत:हून तोपखना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. कृष्ण गायकवाड यांच्याकडून योगेश इथापे याने व्याजाने पैसे घेतले होते. अनेकदा मागूनही त्याने ते परत दिले नाही. या रागातून कृष्णा गायकवाडने त्याच्यावर कोयत्याने वर केले. आरोपीविरूद्ध तोपखना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्याचाराला विरोध करणाऱ्या महिलेची भिवंडीत निर्घृण हत्या

अत्याचाराला विरोध करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी तरूणाला तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 23 वर्षीय पीडित महिला भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका चाळीत राहात होती. ती घरात एकटी असताना संधी साधून आरोपी निखील संजय कडू (वय-20) या तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने अत्याचाराला प्रतिकार केला असता त्याने रागाच्या भरात धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार केले. यात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी नारपोली पोलिसांनी अवघ्या 10 तासांत निखील कडू आरोपीला अटक केली आहे.

VIDEO : सिन्नर घाटात लाखमोलाची मसिर्डीज SUV जळून खाक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2019 09:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading