• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • तिजोरीत 25 लाखांचं सोनं पाहिलं अन् नियत फिरली, भरत जैन हत्या प्रकरणाचं गूढ उकललं

तिजोरीत 25 लाखांचं सोनं पाहिलं अन् नियत फिरली, भरत जैन हत्या प्रकरणाचं गूढ उकललं

भरत जैन यांचे अपहरण करून त्याच्या दुकानातून सोने-चांदीचे दागिने चोरून त्याला मध्येच सोडण्याचा कट रचला होता.

भरत जैन यांचे अपहरण करून त्याच्या दुकानातून सोने-चांदीचे दागिने चोरून त्याला मध्येच सोडण्याचा कट रचला होता.

भरत जैन यांचे अपहरण करून त्याच्या दुकानातून सोने-चांदीचे दागिने चोरून त्याला मध्येच सोडण्याचा कट रचला होता.

  • Share this:
ठाणे, 26 ऑगस्ट : मनसुख हिरेन (mansukh hiren case) याचा मृतदेह ज्या रेतीबंदर ठिकाणी सापडला होता त्याच ठिकाणी आणि त्याच अवस्थेत ठाण्यातील बी.के.ज्वेलर्सचे मालक भरत जैन (Jewellers Bharat Jain) यांचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. यामुळे मनसुख हिरेन यांच्या प्रमाणेच भरत जैन यांच्या हत्येमागे काही कारण तर नाही ना या चर्चेने गेल्या काही दिवस ठाण्यामध्ये जोर धरला होता. मात्र, ठाणे पोलिसांनी अथक प्रयत्न करून या चर्चेला आता पूर्णविराम दिला आहे. भरत जैन यांची चोरीच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलेला आहे. आज ठाणे पोलिसांनी (thane) ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषद घेऊन हत्येचं गूढ उकललं असल्याची माहिती दिली.  14 ऑगस्टच्या रात्री भरत जैन हे रहस्यमयरित्या गायब झाले होते. त्यांनी घरच्यांना रात्री उशिरा संपर्क केला होता पण नंतर काहीच संपर्क झाला नाही, शेवटी भरत जैन यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलीस तपास करत असतानाच अनेक धक्कादायक माहिती समोर आली यात एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. या सीसीटीव्ही फुटेजनुसार एक व्हॅगनार गाडी भरत जैन यांना घेऊन जात असताना दिसली, यातील तरुणाचा शोध घेत पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा उलगडा केल्याचे बोलले जात आहे. IPL 2021 : जगातला नंबर 1 बॉलर आयपीएल खेळणार, विराटने 4 मॅचनंतरच केलं होतं बाहेर पोलिसांनी अटक केलेला आरोपी अतुल मिश्रा (atul mishra) हा भरत जैन यांच्याकडे वाचमॅन म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी अतुल मिश्रा याने भरत जैन यांच्याकडील काम सोडले होते. कामावर असताना भरत जैन यांच्याकडे किमान अर्धा किलो सोने असते त्याची सर्व माहिती अतुल मिश्रा याने मिळवली होती. तसंच संपूर्ण रेकी करुन भरत जैन कधी दुकानात येतात, कधी घरी जातात कोणत्या रस्त्याने जातात त्याच्यासोबत कोण असतं या सर्व बाबींची रेकी अतुल मिश्रा याने केली होती आणि हे सर्व ठरल्यानंतर अतुल मिश्रा याने त्याच्या तीन साथीदारांना भरत जैन यांचे अपहरण करून त्याच्या दुकानातून सोने-चांदीचे दागिने चोरून त्याला मध्येच सोडण्याचा कट रचला होता. दरम्यान, भरत जैन यांचे अपहरण केल्यानंतर आपला कट उघडकीस येऊ नये आपली ओळख किंवा आपला चेहरा भरत जैन त्याला दिसू नये म्हणून भरत जैन यांच्याकडे पूर्वी कामाला असलेल्या अतुल मिश्रा याने आपला चेहरा पूर्णपणे झाकला होता. पण तरी देखील भरत जैन यांनी त्याला ओळखले आणि इथेच सर्व गडबड झाली. आपली चोरी पकडली गेली. जर आपण भरत जैन याला सोडून दिलं तर ते पोलिसात आपली तक्रार करेल आणि पोलीस आपल्याला अटक करतील. या भीतीने अतुल मिश्रा आणि त्याच्या साथीदारांनी भरत जैन यांचे हात बांधले आणि त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडी ते फेकून दिला.  त्यांचा मृतदेह 20 ऑगस्टला तरंगत खाडी किनाऱ्याला आला. राज्य सरकारचा मोठा निर्णय! शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचाही होणार समावेश तर वॅगनार गाडीमुळे अतुल मिश्रा सोबत असलेल्या एका आरोपीची ओळख पटली आणि भरत जैन यांच्या हत्येचा उलगडा झाला. जैन यांची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह हातपाय बांधून खाडीत टाकल्याची तसेच दुकानातील दीड लाख रुपयांचे चांदीचे दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिली होती. परंतु, या हत्येचे दोन्ही मुख्य सूत्रधार पसार झाले होते. नौपाडा पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून या दोघांच्या हाती बेड्या ठोकल्या आहेत. त्यापैकी एक जण कळवा तर दूसरा खोपट परिसरात राहणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले. जैन यांच्या दुकानात असलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांची आम्हाला माहिती होती. तिथे चोरी करणे हाच आमचा उद्देश होता. परंतु, सुमारे 25 लाख रुपये किंमतीचे अर्धा किलो सोने असलेली तिजोरी आम्हाला उघडता आली नाही. त्यामुळे आमच्या हाती दीड किलो चांदीच लागली. जैन यांना जिवंत सोडले असते तर त्यांनी पोलिसांकडे आमची माहिती दिली असती आणि आम्हाला लगेच अटक झाली असती. ती होऊ नये यासाठी जैन यांना ठार मारल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे.
Published by:sachin Salve
First published: