सिंहगड संस्थेनं पगार थकवले म्हणून शिक्षकांचं धरणं आंदोलन

सिंहगड संस्थेनं पगार थकवले म्हणून शिक्षकांचं धरणं आंदोलन

ल्या १४ महिन्यांपासून फक्त ४० टक्के पगार होतो पण गेल्या दोन महिन्यात तोही मिळाला नाही अशी तक्रार या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. पगार न मिळाल्यामुळे ५ हजार प्राध्यापक आंदोलनवर बसले आहेत.

  • Share this:

पुणे, 19 डिसेंबर : पुण्यातल्या सिंहगड संस्थेतले शिक्षक कालपासून धरणं आंदोलनावर बसले आहेत. गेल्या १४ महिन्यांपासून फक्त ४० टक्के पगार होतो पण गेल्या दोन महिन्यात तोही मिळाला नाही अशी तक्रार या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. पगार न मिळाल्यामुळे ५ हजार प्राध्यापक आंदोलनवर बसले आहेत. यात अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन शाखांच्या शिक्षकांचाही समावेश आहे.

संस्थाचालक मारुती नवले यांनी लवकरात लवकर आमचा पगार द्यावा, आणि तो राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावा, सहकारी बँकेत नाही, अशा या शिक्षकांच्या प्रमुख मागण्या आहेत. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही, अशी भूमिका या शिक्षकांनी घेतली आहे.

शासनाकडून शिष्यवृत्ती आणि इतर योजनांअंतर्गत येणारा निधी आलेला नाही, म्हणून पगार होत नाही आहे. आम्ही तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की आम्ही सर्व संबंधितांशी चर्चा केली आहे. हे प्रकरण लवकरात लवकर सोडवू असा आमचा विश्वास आहे. असं स्पष्टीकरण संस्थेकडून शिक्षकांना देण्यात आलं आहे.

पण आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन करू असा इशारा प्राध्यापकांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2017 11:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading