मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कारच्या भीषण अपघातात आई शिक्षिका जागीच ठार, 1 वर्षांचा चिमुरडा थोडक्यात बचावला

कारच्या भीषण अपघातात आई शिक्षिका जागीच ठार, 1 वर्षांचा चिमुरडा थोडक्यात बचावला

समोरून येणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो कारने गजभिये यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात कारचा चुराडा झाला.

समोरून येणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो कारने गजभिये यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात कारचा चुराडा झाला.

समोरून येणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो कारने गजभिये यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात कारचा चुराडा झाला.

अमरावती, 29 नोव्हेंबर : अमरावती (amravati) येथील दर्यापूर तालुक्यातील म्हैसपूर फाट्याजवळ इथं कारचा भीषण (car accident) अपघात झाला आहे. या अपघातात नागपूर (nagpur) येथील एका शिक्षिकेचा (teacher dead) मृत्यू झाला आहे. तर पती गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर गौरखेडा रिंग रोड इथं राहणारे 45 वर्षीय प्रेम हरिदास गजभिये हे आपल्या 40 वर्षीय शिक्षिका पत्नी भारती गजभिये आणि एक लहान मुलगा आणि मुलाची काळजी घेणारी घर काम करणारी 17 वर्षीय वंशिका विलास मानकर हे सर्व जण कारने वरुड येथून दर्यापूर रस्त्याने अकोल्याला जात होते.

हेअर सेटिंगचा गावठी जुगाड, हा Viral Video पाहिलात का?

दर्यापूर म्हैसपूर फाट्याजवळ कार पोहोचली असताना समोरून येणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो कारने गजभिये यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात कारचा चुराडा झाला. या भीषण अपघातात यात शिक्षिका असलेली भारती गजभिये यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रेम गजभिये यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.  या अपघातात वंशिका मानकर ही युवती सुद्धा जखमी झाली. सुदैवाने या अपघातात त्यांचा एक वर्षांचा लहान मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.

Earthquake: पेरुमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप, पाहा पडझड दाखवणारे भयंकर PHOTOs

घटनास्थळी नागरिकांनी सर्वाना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे यांनी रुग्णालयात दाखल करून सोशल मीडियावरून ओळख पटविण्यासाठी आवाहन केले.  नातेवाईकापर्यंत बातमी पोहोचली व नातेवाईक तातडीने अमरावती पोहोचले. शिक्षिका गजभिये यांचं अपघाती निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

खामगावजवळ अपघातात एक ठार

दरम्यान, खामगावहून शेगावकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा शहराबाहेरील एसएसडीव्ही इंग्लिश स्कूलसमोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. मृतक हा खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील महेश भगतसिंग पवार हा असल्याची ओळख पटली आहे.

सचिन वाझे-परमबीर सिंग भेट पूर्वनियोजित? समन्स रुमबाहेरील गार्डची चौकशी होणार

खामगावहून शेगावकडे प्लसर मोटारसायकल वाहनाने बोरजवळा येथील महेश भगतसिंग पवार हा युवक जात असताना एसएसडीव्ही इंग्लिश स्कूलसमोर अपघातात ठार झाला आहे.  घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेवून तपास सुरू केला आहे.

First published: