किशोर गोमासे, प्रतिनिधीवाशिम, 13 सप्टेंबर : घराघरात सासू आणि सुनेचं भांडण आपण नेहमीच बघतो. मात्र वाशिम (washim) जिल्ह्यातील अशी एक सासू आहे ज्यांनी आपल्या दोन्ही सुनांना चक्क गौराईच्या (gauri ) मखरात बसवून त्यांना गौरीचं रूप देत गौराई अगमनापासून तर विसर्जनापर्यंत त्यांची पूजा करीत सण साजरा करत आहे.
राज्यभरात गौराईचा सण पारंपारिक पद्धतीने मूर्त्याची पूजा करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र वाशिम शहरातील सिंधुबाई सोनुने या आपल्या दोन सुनांनाच गौराई म्हणून बसवून तीन दिवस हा सण साजरा करत आहेत. सिंधुबाई सोनुने यांनी सुनामध्येच गौराई बघून केलेल्या या वेगळ्या उपक्रमामुळे जिल्हाभरातून त्यांचं कौतुक होत आहे.
#वाशीम : सासूबाईंनी सुनांना गौराई म्हणून बसविले,चालत्या बोलत्या लक्ष्मीच्या रुपात साजरा करत आहेत गौराईचा सण... pic.twitter.com/rfyuay33Hf
वाशिम शहरात राहणार्या सिंधुबाई सोनुने या सासू आपल्या घरील गौरी पूजन सोहळा रेखा सोनुने व पल्लवी सोनुने या दोन्ही सुनांची पूजा अर्चना करून त्यांना देवी स्वरुपात समजून साजरा करत आहेत. त्यांनी जिवंत चालत्या बोलत्या महालक्ष्मींचा अशा प्रकारे सोहळा साजरा करून समाजा पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
एका मॅचसाठी फक्त 13 हजार, कित्येक महिने पगार नाही, रेकॉर्डब्रेक खेळाडूचा संन्यास
हा गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. सासू आणि सुना यांच्यामधील एक अनोखं नातं निर्माण होऊन आपसात सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा असा आपला उद्देश असल्याचे सिंधुबाई सोनुने यांनी सांगितलंय.
घराघरात सासू आणि सूनेचं भांडण आपण नेहमीच बघतो. मात्र सिंधुबाई या त्याला अपवाद ठरव्या आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या सासूबाईंचा अभिमान वाटत असल्याचं त्यांच्या गौराई म्हणून पूजन होत असलेल्या सुनबाई रेखा सोनुने, यांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.