आईने दिले नाही कुरकुरे खाण्यासाठी 5 रुपये, 8 वर्षांच्या मुलाने घर सोडले आणि निघाला रेल्वे रुळावरून...

आईने दिले नाही कुरकुरे खाण्यासाठी 5 रुपये, 8 वर्षांच्या मुलाने घर सोडले आणि निघाला रेल्वे रुळावरून...

आईने आपल्याला 5 रुपये दिले नाही, याचा राग मुलाला अनावर झाला. त्याने शाळेचे दफ्तर पाठीला लावले आणि सायकल घेऊन घराबाहेर पडला.

  • Share this:

औरंगाबाद, 26 डिसेंबर : लहान मुलांना त्यांच्या मनासारखे झाले की लगेच रुसतात. आपली मागणी पूर्ण करुन घेण्यासाठी मुलं काय करतील याचा नेम नाही.  आईने कुरकुरे (kurkure) घेण्यासाठी 5 रुपये दिले नाही म्हणून 8 वर्षांच्या मुलाने घर सोडून गेल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) समोर आली आहे.

आठ वर्षांच्या चिमुरडा आईसोबत दुकानात गेल्यावर या ना त्या गोष्टी मागत होता. शुक्रवारी त्याने आईकडे 5 रुपयांचे कुरकुरे मागितले. पण त्याच्या आईने त्याला कुरकुरे खाण्यासाठी 5 रुपये काही दिले नाही. आईने आपल्याला 5 रुपये दिले नाही, याचा राग मुलाला अनावर झाला. त्याने शाळेचे दफ्तर पाठीला लावले आणि सायकल घेऊन घराबाहेर पडला.

चालत्या गाडीला आग लागण्याची काय आहेत कारणं?या वस्तू गाडीत असल्यास करू शकता बचाव

घरापासून काही अंतर दूर गेल्यानंतर त्याने रेल्वेची पटरी गाठली. त्यानंतर तो रुळावरून चालत केला. धक्कादायक म्हणजे हा मुलगा रेल्वेच्या रुळावरून  जाताना समोरून 3 रेल्वे तिथून गेल्या. सुदैवाने त्याने रेल्वे समोर येताना पाहून बाजूला झाला होता. पण, रेल्वे गेल्यानंतर तो पुन्हा रुळावरून चालत होतो.

चौथ्या वेळेस तो पुलावर होता आणि रेल्वे समोरून येत होती. रेल्वे इंजिन मोटरमनने जोरात हॉर्न वाजवला आणि त्याच वेळेस रेल्वेचा वेग सुद्धा कमी झाला. त्यावेळी रेल्वे रुळाच्या बाजूला उभ्या असलेल्या काही नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन या मुलाला  रेल्वे रुळापासून सायकल सहित बाजूला केले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

चीनचं पाप जगासमोर येणार, अमेरिका करणार मुस्लीम अत्याचाराची चौकशी!

जेव्हा या मुलाकडे विचारपुस केली असता त्याने आईने 5 रुपये दिले नाही म्हणून घरं सोडलं असं सांगितलं. स्थानिकांनी ही बाब पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी या मुलाच्या आई आणि नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी आई-वडिलांची समजूत काढून मुलाला त्यांच्याकडे स्वाधीन केले.

Published by: sachin Salve
First published: December 26, 2020, 2:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading