'सिंघम'चा प्लास्टिकबंदीला पाठिंबा,पण जाहिरात केलेल्या पान मसाल्याचा सर्वात जास्त कचरा !

'सिंघम'चा प्लास्टिकबंदीला पाठिंबा,पण जाहिरात केलेल्या पान मसाल्याचा सर्वात जास्त कचरा !

- 87 टक्के प्लास्टिक कचरा भारतीय ब्रँड्स चा तर 13 टक्के आंतरराष्ट्रीय ब्रँड्स चा होता

  • Share this:

अद्वैत मेहता,पुणे

पुणे, 22 जून : उद्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू होणार आहे. सर्वच स्तरातून कुठे स्वागत होतं तर कुठे नाराजी व्यक्त होतं. जनजागृतीसाठी अनेक सेलिब्रेटीपुढेही येत आहे. आजच अभिनेते अजय देवगणने प्लास्टिकबंदीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. पण, अजय ज्या विमल पान मसाल्याची जाहिरात करतो त्याचाच कचरा सर्वात जास्त असल्याचं समोर आलंय.

पुण्यासह देशातील 10 शहरात प्लास्टिक ब्रँड ऑडिट करण्यात आलंय. पुण्यात 16 ते 20 मे दरम्यान 300 घरांत आणि गरवारे पुलाजवळील नदी परिसरात स्वच्छ संस्था,पुणे पालिका यांनी हे सर्वेक्षण केलं. यातून कोणत्या ब्रँडचा किती प्लास्टिक कचरा जमा होतोय हे पुढं आलंय.

'जग सुंदर ठेवण्यासाठी प्लास्टिकबंदी योग्य आहे'

प्लास्टिक ब्रँड ऑडिट मध्ये कचऱ्याचे काच, कागद ,धातू,प्लास्टिक असं वर्गीकरण करण्यात आले

त्यानंतरर प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण करून सिंगल लेयर,मल्टिलेयर,पेट,कडक प्लास्टिक, थर्मोकोल ,पोलीस्टायरिन याप्रमाणे वर्गवारी करण्यात आली.

या सर्वेक्षणातून पुढं आलेल्या आकडेवारी आणि माहितीवर

- 87 टक्के प्लास्टिक कचरा भारतीय ब्रँड्स चा तर 13 टक्के आंतरराष्ट्रीय ब्रँड्स चा होता

- 52 टक्के ब्रँडेड प्लास्टिक हे मल्टिलेयर, 40 टक्के प्लास्टिक सिंगल लेयर,पेट बाटल्या 6 टक्के आणि कडक प्लास्टिक 2 टक्के होतं.

15 सर्वात जास्त मिळालेले ब्रँड्स पुढीलप्रमाणे

विमल पान मसाला, चितळे,पार्ले, हल्दीराम फूड्स, mondleez, काश्मिरी प्रा.लि, अॅपल पोलीमर्स, नेस्ले, अमूल,सुमेरू,फेलअर रायटिंग पेन, ब्रिटानिया इंडस्ट्रीज्, पिडीलाईट इंडिया, बालाजी वेफर्स आणि कोका कोला...

ब्रँड ऑडिटमध्ये सहभागी झालेल्या कचरा वेचकांनीही त्यांचे अनुभव सांगितले आणि नागरिक आणि कंपन्या यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्यात.

एकूणच या सर्वेक्षणातून ज्या प्लास्टिकवर पुर्नप्रक्रिया होईल ती केली पाहिजे आणि ज्यावर होणार नाही त्याबाबत व्यावहारिक तोडगा काढण्याची गरज असल्याचे पुढं आलं.

VIDEO : सर,आम्हाला सोडून जाऊ नका!, एक ह्रदयस्पर्शी निरोप सोहळा

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली मात्र पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लास्टिक निर्मूलन करण्याचं मोठं आव्हान पेलावे लागणार आहे हेच या सर्वेक्षणातून अधोरेखित झालंय.

दरम्यान, आज मुंबईत प्लास्टिक बंदीच्या समर्थनात अभिनेता अजय देवगण आणि काजोल पुढे आले. यावेळी "जोपर्यंत तुम्ही स्वत: प्लास्टिक बंदीसाठी पुढे येणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही. भविष्यात आपल्या मुलांसाठी आपल्या सर्वांना पुढे येण्याची गरज आहे." असं आवाहन यावेळी अजयने केलं.

First published: June 22, 2018, 11:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading