Home /News /maharashtra /

धावत्या ट्रॅक्टरवर माकडाने मारली उडी, पुढे घडलं असं काही की...

धावत्या ट्रॅक्टरवर माकडाने मारली उडी, पुढे घडलं असं काही की...

रामसिंग हे बुलडाण्याकडून खामगावकडे ट्र्रॅक्टर चालवत येत होते. बोथा गावाजवळ पोहोचले असता..

रामसिंग हे बुलडाण्याकडून खामगावकडे ट्र्रॅक्टर चालवत येत होते. बोथा गावाजवळ पोहोचले असता..

रामसिंग हे बुलडाण्याकडून खामगावकडे ट्र्रॅक्टर चालवत येत होते. बोथा गावाजवळ पोहोचले असता...

  राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 12 ऑगस्ट : माकडं (monkey) दिसल्यावर भलेभले आपला मार्ग बदलत असतात. वस्तीत माकडं आली तर लोक त्यांच्यापासून दूर राहतात. पण, बुलडाण्यात (buldhana) माकडांनी एका धावत्या ट्रॅक्टरवर (tractor) हल्ला चढवला. यात ट्रॅक्टर पलटी झाला. सुदैवाने या हल्लात ट्रॅक्टरचालकाला दुखापत झाली नाही. घडलेली हकीकत अशी की,रामसिंग नावाच्या व्यक्तीसोबत ही घटना घडली. रामसिंग हे बुलडाण्याकडून खामगावकडे ट्र्रॅक्टर चालवत येत होते. बोथा गावाजवळ पोहोचले असता अचानक माकडाने त्यांच्यावर झेप घेतली. मॉल्स आणि हॉटेल्स मालकांचे अभिनंदन, प्रशांत दामलेंचा सरकारवर निशाणा त्यामुळे रामसिंग यांचा ट्रॅक्टरवरून ताबा सुटला. त्यांनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ट्रॅक्टर रोडच्या बाजूला खड्ड्यात जाऊन कोसळला. रोडचे नुतनीकरण काम चालू असल्यामुळे ट्रॅक्टर हे अचानक खड्ड्यांमध्ये जाऊन पलटी झाले. सुदैवाने ट्रॅक्टर चालक रामसिंग यांना इजा झाली नाही. पण यात ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे. रामसिंग हे राजस्थानचे रहिवासी असून उदनिर्वाहसाठी बुलडाण्यात आले आहे.

  पोझ देता देता घसरला पाय; Eiffel Tower जवळ धाडकन कोसळली महिला; VIDEO VIRAL

  अपघाताची माहिती मिळताच, हिवरखेड पोलीस स्टेशन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बुलडाणा बोथा या मार्गावर जंगली माकांडांचा मुक्त संचार हा प्रमुख मार्गावर पहावयास मिळते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. आज ही अशाच एका माकडाने चक्क चालत्या ट्रॅक्टरवर झडप घेतल्याने ट्रॅक्टर पलटी झालं आहे. या घटनेमुळे या मार्गावरून जाणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या