मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोदी सरकारच अधिकाऱ्यांना तोडपाणी करायला सांगते, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मोदी सरकारच अधिकाऱ्यांना तोडपाणी करायला सांगते, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

'एनसीबीचा कारवाईमध्ये भाजपचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे, त्याने अद्याप पर्यंत कुठलेही व्हिडीओ समोर दिले नाहीत,'

'एनसीबीचा कारवाईमध्ये भाजपचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे, त्याने अद्याप पर्यंत कुठलेही व्हिडीओ समोर दिले नाहीत,'

'एनसीबीचा कारवाईमध्ये भाजपचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे, त्याने अद्याप पर्यंत कुठलेही व्हिडीओ समोर दिले नाहीत,'

बीड, 24 ऑक्टोबर : आर्यन खान अटक (Aryan Khan arrest case) प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) पंच किरण गोसावीने 25 कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे आता राजकीय वाद पेटला आहे. 'केंद्रातील भाजप सरकार हे ब्लॅकमेलिंग सरकार आहे. भाजप सरकार अधिकाऱ्यांना  तोडपाणी करायला सांगत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे.

अंबेजोगाई येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा पार पडला.  या मेळाव्यात राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होत्या. नवनिर्वाचित खासदार म्हणून निवृत्त झाल्यानंतर अंबेजोगाई शहराच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या मेळाव्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असता नाना पटोले यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.

नराधम! चिमुकलीला चॉकलेटच्या बहाण्याने घेऊन गेला युवक, इमारतीत सापडला मृतदेह

'लोकशाहीमध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीने सरकार आलेला आहे. तुम्ही आमच्या विरोधात आहे तर तुमच्या विरोधात आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. भाजप सरकार च्या काळात दोन वर्षे छगन भुजबळ कारागृहात होते. आता त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा दुरुपयोग करतात याचं हे उदाहरण आहे, असं नाना पटोले म्हणाले.

एनसीबीचा कारवाईमध्ये भाजपचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे, त्याने अद्याप पर्यंत कुठलेही व्हिडीओ समोर दिले नाहीत, त्यांनी शाहरुख खानच्या मुलाला अडकवण्यासाठी केलेले हे प्रकरण होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे तसंच या माध्यमातून हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे.

वाढदिवसाला मलायका अरोराने अर्जुन कपूर आणि करिना कपूरसोबत केली लेट Night Party...

मुद्रा पोर्टवर 21 हजार कोटीचे जे ड्रग्ज मिळालं त्यात पोर्ट कुणाच्या ताब्यात होती त्याचा मालक कोण होता. देशात आतापर्यंत किती आले याची चौकशी व्हावी. देशातील तरुणांना ड्रग्जमध्ये डुबवण्याचे पाप भाजपचे सरकार करत आहे, असा आरोप नाना पाटोले यांनी केला.

First published: