बारामतीतील अंगावर शहारे आणणारी घटना, अपघाताचा धक्कादायक VIDEO

बारामतीतील अंगावर शहारे आणणारी घटना, अपघाताचा धक्कादायक VIDEO

बाबासाहेब खोमणे हे सकाळी बारामतीला दूध घालण्यासाठी आले होते. शहरात घरोघरी दूध देऊन घरी जात असतानाच ढवाण पाटील चौकात...

  • Share this:

बारामती, 25 जानेवारी : बारामती (Baramti) शहरातील ढवाण पाटील चौकात मागील आठवड्यात दुधाचा टँकर आणि दुचाकीचा अपघात झाला होता. यात दुचाकीस्वार टँकरखाली चिरडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा अंगाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

शहरातील ढवाण पाटील चौकात 12 जानेवारी रोजी हा भीषण अपघात झाला होता. या चौकात झालेल्या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मोटरसायकल जात असणारे तालुक्यातील माळेगाव येथे राहणारे बाबासाहेब खोमणे यांचा यात मृत्यू झाला आहे.

बाबासाहेब खोमणे हे सकाळी बारामतीला दूध घालण्यासाठी आले होते. शहरात घरोघरी दूध देऊन  घरी जात असतानाच ढवाण पाटील चौकात दुधाच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे काही कळण्याच्या आत ते दुधाच्या टँकरखाली सापडले. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दुधाचा रिकामा टँकर हा दूध भरण्यासाठी फलटणहून बीडकडे निघाला होता. सदर दुधाचा टँकर हा तिरुमाला डिअरी कुटे ग्रुपचा आहे. अपघात झाल्यानंतर आरोपी रामभाऊ सालगुडे हा स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला होता. सदरचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिदे करत आहेत.

Published by: sachin Salve
First published: January 25, 2021, 10:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या