Home /News /maharashtra /

Weather Forecast : सावधान ! पुन्हा पावसाचा हाहाकार, हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्यांना दिला अतिमुसळधारेचा alert

Weather Forecast : सावधान ! पुन्हा पावसाचा हाहाकार, हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्यांना दिला अतिमुसळधारेचा alert

हवामान खात्याच्या माहितीनुसार (imd alert heavy rain in Maharashtra) उत्तर कोकणात (north Konkan) मध्यम ते मधूनमधून तीव्र सरी पालघर, मुंबई ठाणे रायगड या भागात पुढील चार तास पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे

  मुंबई, 06 जुलै : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. (Weather Forecast) दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार (imd alert heavy rain in Maharashtra) उत्तर कोकणात (north Konkan) मध्यम ते मधूनमधून तीव्र सरी पालघर, मुंबई ठाणे रायगड या भागात पुढील चार तास पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. दक्षिण कोकणातही अशीच परिस्थिती राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra rain alert)

  पुढील 4 ते 5 दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याचे अधिकारी होसाळीकर यांनी दिली. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकण,मध्य महाराष्ट्र,विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे.

  हे ही वाचा : कोट्यवधीचं बजेट असलेल्या मुंबईची दरवर्षी तुंबई का होते? ही आहेत 5 कारणं, शेवटचं सर्वात महत्वाचं

  हवामान खात्यानुसार, कर्नाटकच्या अंतर्गत भागात 5 ते 7 जुलै दरम्यान पाऊस पडेल. कोस्टल आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये 3 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य भारताच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडेल. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील काही भागांचा समावेश आहे.

  मुंबईत पावसाने दैना

  मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये 2 फुट पाणी साचलं आहे. दक्षिण मुंबईतील वरळी चौकीच्या परिसरातही पाणी साचलं आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक मंदावली आह. माणखुर्दे रेल्वे स्टेशनच्या दक्षिकडील भादात पाणी साचले आहे. माणखुर्द चौकातही हीच परिस्थिती आहे. त्याचा परिणाम या भागातील वाहतुकीवर झाला आहे.  दादर, भोईवाडा, किंग सर्कल या परिसरातील सखल भागामध्येही पाणी साचले आहे.

  हे ही वाचा : रेल्वेत सुसाट वेगानं मिळतील जॉब्स; कोणतीही परीक्षा नाही; थेट 1659 जागांसाठी मेगाभरती; इथे बघा डेटल्स

  समुद्राला मोठी भरती

  मुंबईत आज दिवसभर पाऊस सुरूच राहिल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आज दुपारी 4 वाजून 49 मिनिटांनी 3.27 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असंही हवामान विभागानं बजावलंय.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Monsoon, Rain fall, Rain flood, Weather forecast, Weather update

  पुढील बातम्या