'आजपर्यंत इतिहासात जे घडलं नाही ते हळूहळू महाराष्ट्रात घडलं. ग्रामीण भागात एक म्हण असते, त्या प्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या अंगात आल्यामुळेच ही महाविकास आघाडी झाली जन्माला आली' असं म्हणताच विश्वजीत कदम यांच्या या विधानाने सभागृहात एकच हश्शा पिकली. काय सांगता! चेहरा रिंकल फ्री करणारं इंजेक्शन घेतल्यास कोरोना होत नाही? तसंच, यावेळी त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबतही भाष्य करून शिंदे समर्थकांना आश्चर्याचा धक्का दिला. 'प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रिमंडळात नाहीत याची खंत वाटते. मात्र कदाचित लवकरच प्रणिती शिंदे या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीच नव्हे तर कॅबिनेट मंत्री होतील, असं सूचक विधान त्यांनी केलं आणि उपस्थित शिंदे समर्थकांनी टाळ्याच्या कडकडाटात त्यांच्या विधानाचे स्वागत केले.संजय राऊतांच्या अंगात आल्यामुळेच महाविकास आघाडी झाली, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या विधानाने कॉंग्रेस भवनात हास्याचे फवारे pic.twitter.com/grx132NqIS
— News18Lokmat (@News18lokmat) September 18, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut