नेहाल भुरे, प्रतिनिधी
भंडारा, 29 नोव्हेंबर : अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. अजूनही राज्य सरकारकडून कोणतीही मदत पोहोचली नाही. अशातच विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची घटना भंडाऱ्यात समोर आली आहे. अवघ्या 60 रुपयांची परतावा रक्कम देवून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. यासाठीच विमा रक्कम भरली होती का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थिती केला आहे.
मोहाडी येथील शेतकरी विश्वास पाटील यांच्यासोबत हा किस्सा घडला आहे. त्यांची मोहाडी येथे 3 एकर शेती आहे. त्यांनी खरीप हंगामात भात पिक लावले होते. यासाठी त्यांना 50 हजार रुपये खर्च आला होता. दरम्यान जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात तिनदा अतिवृष्टी झाली. त्यात त्यांचे धान पिक पूर्णपुणे पाण्यात बुडाले. सतत पाण्यात राहिल्याने धान पिक करपले. तलाठीमार्फत पंचनामे झाले.
(कोल्हापुरात अग्नितांडव, गरिबांच्या संसाराची राखरांगोळी, 4 ते 5 घरं जळून कोळसा)
आता नुकसान भरपाई म्हणून काढलेला पिक विमा कामात येईल असे पाटील यांना वाटत असतांना त्यांना 60 रुपये पिक विम्याची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आला, व त्यांच्या पाया खालील वाळू सरकली. पिक विमा काढण्यासाठी रक्कम म्हणून 820 रुपये लागले आणि नुकसानी भरपाई परतावा केवळ 60 रुपये भेटल्यांने ही अशी कशी विम्याद्वारे मदत असा प्रश्न त्यांना पडला आहे. आता ती रक्कम परत सरकारला पाठवणार असल्याचे पाटील म्हणत आहे. त्यामुळे खरंच पिक विमा काढून फायदा मिळतोय का असा सवाल त्यांना पडला आहे.
(प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, आरपीआयच्या कोकण अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी)
पिक विमा काढायची रक्कम 820 रुपये व परतावा भरपाई रक्कम 60 रुपये त्यामुळे यासाठीच विमा रक्कम भरली होती का? असा संतप्त पाटील यांनी विचारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news