कमालच झाली!,आरटीओने दिलं मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर चालवण्याचं लायसन्स

कमालच झाली!,आरटीओने दिलं मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर चालवण्याचं लायसन्स

आरटीओवाल्यांनी चक्क राज्याचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण नितीन गडकरी यांच्याच नावाने वाहन चालवण्याचा परवाना तयार केल्याची धक्कादायक बाब उघड झालीये.

  • Share this:

जळगाव, 31 जुलै : आरटीओ कार्यालयातला कारभार कसा असतो हे सर्वसामन्यांना चांगलाच माहिती आहे. पण आता तर या आरटीओवाल्यांनी चक्क राज्याचे मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण नितीन गडकरी यांच्याच नावाने वाहन चालवण्याचा परवाना तयार केल्याची धक्कादायक बाब उघड झालीये.

शिवसेनेला सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजप नको : उद्धव ठाकरेंची रणनीती

जळगाव आरटीओ कार्यालयातून देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नावाने वाहन चालवण्याचा परवाना तयार करण्यात आल्याचं उघड झाल्यानं खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्यांना जळगाव आरटीओने 2014 पर्यंतचा अवजड वाहन आणि ट्रॅक्टरचा परवाना दिलाय. तर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने 1234 या क्रमांकाचे वाहन चालवण्याचा 2018 पर्यंतची मुदत असलेला परवाना 2004 मध्ये तयार केला गेला आहे. त्यात त्यांना मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी दाखवण्यात आले आहे.

या घटनेवरून जळगाव आरटीओ कार्यालयातील कागदपत्र किती सुरक्षित आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे परवाने आरटीओ कार्यालयातून दिली गेली नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे.

VIDEO : रेल्वे येत असल्याची पाहून 'तो' रूळावर जाऊन झोपला...

दरम्यान, आरटीओ अधिकारी जयंत पाटील यांनी ही घटना 2004 ची असल्याने याबाबत चौकशी करून पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं.

आतापर्यंत राजकीय नेत्यांच्या नावाने आधारकार्ड, मतदानकार्ड तयार करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे.

First published: July 31, 2018, 6:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading