• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मोठी बातमी, 'ते' पत्र महिलेनं पाठवलंच नव्हतं! संजय राठोड यांना क्लिन चीट

मोठी बातमी, 'ते' पत्र महिलेनं पाठवलंच नव्हतं! संजय राठोड यांना क्लिन चीट

'अर्जावरील सही सुद्धा त्यांची नाही, त्यांचे पतीचे नाव सुद्धा खोटे आहे. त्यांची आमदार संजय राठोड यांच्या विषयी काही तक्रार नव्हती'

'अर्जावरील सही सुद्धा त्यांची नाही, त्यांचे पतीचे नाव सुद्धा खोटे आहे. त्यांची आमदार संजय राठोड यांच्या विषयी काही तक्रार नव्हती'

'अर्जावरील सही सुद्धा त्यांची नाही, त्यांचे पतीचे नाव सुद्धा खोटे आहे. त्यांची आमदार संजय राठोड यांच्या विषयी काही तक्रार नव्हती'

  • Share this:
यवतमाळ, 21 ऑगस्ट : शिवसेनेचे (shivsena)  नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांच्यावर एका महिलेनं शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. पण, पोलीस (yavatmal police) तपासातून या प्रकरणी कोणतेही तथ्य समोर आले नाही. त्यामुळे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. एका महिलेनं संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात पोस्टाने पाठवली होती. या प्रकरणी एसआयटीची स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर संजय राठोड यांची 14 तारखेला जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी पूर्ण केली, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांनी याबद्दल माहिती दिली. 14 ऑगस्टला नमूद महिला तिचे वडील भाऊ आणि पती यांचे सोबत ती पोलीस स्टेशन घाटंजी येथे बयान देण्यासाठी विशेष चौकशी पथक का समोर उपस्थित राहिल्या. चौकशी पथकातील महिला पोलrस अधिकाऱ्यांनी सदर महिलेची मनस्थिती ठीक असल्याची खात्री केली आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्या महिलेचे कॅमेरा विचारपूस करून बयाv नोंदविण्यात आलेला आहे. या बयानामध्ये सदर महिलेने दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी सदर अर्ज त्यांनी स्वतः पाठविलेला नाही, सदर अर्जामध्ये त्यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. चोरीच्या आरोपानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूने सौरव गांगुलीकडे मागितली मदत एवढंच नाहीतर, अर्जावरील सही सुद्धा त्यांची नाही, त्यांचे पतीचे नाव सुद्धा खोटे आहे. त्यांची आमदार संजय राठोड यांच्या विषयी काही तक्रार नव्हती. त्यांच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीड पोस्टाने सदरचा अर्ज केल्याचे नमूद केले आहे, असं दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितलं. तसंच, त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा सदर अर्जाशी काहीएक संबंध नाही. अर्जातील नमूद करत या विषयाच्या बाबी या संपूर्णपणे खोट्या व निराधार असल्याचे निष्पन्न झाले. तसंच,  ज्या पोस्टातून हे पंजीकृत पोस्ट पाठवण्यात आले त्याबद्दल चौकशी केलेली आहे तसंच इतर  साक्षीदार किंवा ज्यांची नावे नमूद होती, त्या सगळ्यांचे बयान दर्ज केलेले आहेत. विशेष चौकशी पथकाने संजय राठोड यांच्याविरोधातील तक्रार आणि आरोप हे संपूर्णपणे खोटे व बिनबुडाचे असल्याचं आणि त्यामध्ये काही तथ्य असल्याची बाब नमूद केलेली आहे. वरुण धवनची पुतणीही करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; फोटोंनी वेधतेय साऱ्यांचंच लक्ष राठोड यांच्या छत्रपती कला शिक्षण कृषी क्रीडा व ग्रामीण विकास प्रतिष्ठान शिवपुरी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ या संस्थेचे सचिव होते. त्यांनी त्या सचिवपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या संस्थेअंतर्गत स्वर्गीय संभाजी नाईक विभाग प्राथमिक आश्रम शाळा शिवपुरी येथे विलास यादव आडे यांचे सहाय्यक शिक्षक पदावर तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत होते. त्यांनी सामाजिक न्याय विभाग यांच्याकडे राजीनामा दिलेला होता. तो संस्थेने मंजुरी केलेला होता. आणि त्या संदर्भात विष्णू राठोड हे आमदार संजय राठोड यांचे संपर्क कार्यालयात चार पाच महिन्यापूर्वी गेले होते आणि आपल्याजवळी विलास आडे यांना पुन्हा संस्थेवर कामकाज करण्यात यावं अशी विनंती केली होती, या बाबी चौकशीत निष्पन्न झालेले आहेत. या निमित्ताने मी यापूर्वी या संस्थेचे मुख्याध्यापक संजय जयस्वाल याच संदर्भामध्ये त्यांच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज येत होते. त्या संदर्भात भडगाव जंगल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्यांच्या तक्रारी प्रमाणे दिनांक 8 जून 2021 रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

केंद्राचा मोठा निर्णय! नोकरी गमावणाऱ्यांना 2022 पर्यंत मिळणार PF, वाचा सविस्तर

या प्रकरणी तपास करण्याची परवानगी मिळण्याबाबत संबंधित संजय राठोड यांच्या मोबाईल क्रमांकावर वेगवेगळ्या दिवशी विविध मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सअप द्वारे मेसेज पाठवून कॉल करून धमकी देणे बदनामी करणे इत्यादी प्रकाराबाबतही काही मेसेज आले त्याबद्दल त्यांनी अजित पवार यांच्याकडे तक्रार दिली होती. त्या संदर्भात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.  तपास करण्याची परवानगी मिळण्याबाबत संबंधित न्यायालयाकडे विनंती करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने सदरची विनंती अमान्य केली आहे. एकंदरीत विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती आमदार संजय राठोड यांच्या विरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज सदर महिलेने स्वतः पाठविलेल्या नाही, हे निष्पन्न झाले आहे.
Published by:sachin Salve
First published: