पिंजऱ्यात घुसून बकऱ्याचा पाडला फडशा, 3 चिमुरड्यांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद

पिंजऱ्यात घुसून बकऱ्याचा पाडला फडशा, 3 चिमुरड्यांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद

या नरभक्षक बिबट्याच्या शोधात अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बीड येथील पथके पाच दिवसांपासून अहोरात्र कार्यरत होती.

  • Share this:

अहमदनगर,  05 नोव्हेंबर : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील  पाथर्डी तालुक्यातील परिसरात  3 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला (leopard) अखेर पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.  या बिबट्याने 3 लहान चिमुरड्यांना घरातून उचलून नेऊन ठार मारले होते.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरात गेल्या 10 दिवसांपासून धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वनविभागाला गुरुवारी पहाटे यश आले आहे.  बिबट्या सावरगाव हद्दीत सटवाई दऱ्याचे वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अडकला होता.  पहाटे 3 वाजेनंतर त्याला जेरबंद करण्यात आले.

ट्रम्प-बायडनची लढतीत श्वान चर्चेत; 13 हजार मतांनी मारली बाजी

या नरभक्षक बिबट्याच्या शोधात अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बीड येथील पथके पाच दिवसांपासून अहोरात्र कार्यरत होती. गुरुवारी पहाटे आष्टी वन परिक्षेत्र हद्दीत भक्ष्याचे शोधात सावरगाव सटवाई दऱ्याचे पठारावर बिबट्या आला होता, अशी माहिती मिळाल्यावर त्या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता.

पिंजऱ्यात एक बोकड ठेवण्यात आले होते. बोकडचं शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या अलगद जाळ्यात अडकला. पिंजऱ्यातील बोकडाचा निम्म्याने फडशा पाडतानाच पिंजऱ्याचा दरवाजा बंद होऊन तो जेरबंद झाला.

शिरापूर डोंगराच्या माथ्यावर आष्टी तालुक्यातील सावरगाव मधील वन विभागाची हद्द आहे. शिरापूर पानतास वाडी, करडवाडी, सटवाई दरा, गाढवदरा परिसरात बिबट्याचा गेल्या अनेक दिवसांपासून वावरत होता. दरम्यानच्या काळात त्याने गर्भगिरीतील अनेक रानडुक्करांचा फडशा पाडला. भक्ष्याची वानवा झाल्याने तो मानवी वस्त्याकडे वळला होता.

जळगाव हादरलं, माजी महापौराच्या मुलाची स्मशानभूमीजवळ निर्घृण हत्या

मागच्या 10 दिवसांत तालुक्यात बिबट्याने तीन बाळांचा बळी घेतला. यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याच्या भितीमुळे तालुक्यामधील लोकं शेतात, कामासाठी जायला घाबरत होते. अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यामुळे पाथर्डीकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Published by: sachin Salve
First published: November 5, 2020, 3:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या