वडील काँग्रेसचे म्हणून मीसुद्धा तिथेच असावं असं नाही - सुजय विखे पाटील

वडील काँग्रेसचे म्हणून मीसुद्धा तिथेच असावं असं नाही - सुजय विखे पाटील

माझे वडील काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते आहेत. माझी आई ही जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. पण तो माझ्या आई-वडिलांचा प्रश्न आहे"

  • Share this:

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 26 डिसेंबर : "वडील काँग्रेसमध्ये असतील आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असावा म्हणजे याचा अर्थ असा होतं नाही की, वडील ज्या पक्षात आहे त्या पक्षात मुलानंही राहिलं पाहिजे. माझं स्वतंत्र मत आहे. मला स्वतंत्र नेतृत्त्व मान्य असेल तर मी तिथे जाईल. भलेही कुटुंबाचा विरोध असला तरी मी थांबणार नाही" असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. ते शिर्डीत बोलत होते. सुजय हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र असून त्यांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

शिर्डीमध्ये आज बुधवारी निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ववत सुरू करावीत याकरिता डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली  राहाता तहसील कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर सुजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी, "विखे पाटील हे भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे, तर तुमच्याकडेही हा पर्याय आहे का?" असा प्रश्न विचारला असता सुजय विखे पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

"माझे वडील काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते आहेत. माझी आई ही जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. पण तो माझ्या आई-वडिलांचा प्रश्न आहे, कोणता पक्ष घ्यायचा हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र निर्णय आहे" अशा शब्दांत सुजय पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

सुजय पाटील पुढे म्हणाले की, "वडील काँग्रेसमध्ये असतील आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असला म्हणजे याचा अर्थ असा होतं नाही वडील ज्या पक्षात आहे त्या पक्षात मुलानेही राहिलं पाहिजे. माझं स्वतंत्र्य मत आहे. मला स्वतंत्र नेतृत्त्व मान्य असेल तर मी तिथे जाईल. भलेही कुटुंबाचा विरोध असला तरी मी थांबणार नाही. शेवटी प्रत्येकाला राजकारणात स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे. जसा आई-वडिलांनी निर्णय घेतला तसा मी ही घेईल."

विशेष म्हणजे, सुजय पाटील हे दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे आहे आणि काँग्रेस या जागेची मागणी सुजय पाटील यांच्यासाठी करत आहे.

'निळवंडे धरणाचं अपूर्ण कालव्याचं काम सुरू करा'

दरम्यान,  निळवंडे कालव्यांची कामे पूर्ववत सुरू करावीत याकरिता डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली  राहाता तहसील कार्यालयासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. शिर्डी साईबाबा संस्थानाने निळवंडे कालव्याच्या कामासाठी 500 कोटींचा निधी दिला आहे तर शासनाचाही निधी शिल्लक आहे. अहमदनगर जिल्हयातील निळवंडे धरणांच्या कालव्याच्या कामासाठी सुरूवात झाली. मात्र, अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी शेतकऱ्यांसह आंदोलन करत काम बंद पाडलं होतं. कालव्यांचं काम पूर्ववत सुरू करावं अशी मागणी 182 गावातील लाभधारक शेतकऱ्यांची आहे. गेल्या 40 वर्षांपासून कालव्यांची कामं रखडल्यानं शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. या कालव्याच्या कामावरून राजकारण होत असून बंदिस्त आणि खुले कालवे यावरून वाद सुरू आहे हा वाद संपुष्टात आणून काम सुरू करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

============================

First published: December 26, 2018, 4:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading