सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली, शेतकऱ्यांकडे मात्र होतंय दुर्लक्ष

सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली, शेतकऱ्यांकडे मात्र होतंय दुर्लक्ष

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत, मदत कधी मिळणार?

  • Share this:

औरंगाबाद.15 नोव्हेंबर: सध्या महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत शेतकऱ्यांकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष होत आहे. अवकाळी पाऊस आणि त्यामुळे राज्यातील पिकांचं झालेलं नुकसान यामुळे शेतकरी चांगलाच हवालदील झाला आहे. औरंगाबादमधील पिंपरीराजा गावातील शेतीची अवस्था पाहिली तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. पावसाळ्यात नेमका पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली. तर आता काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीचं पिकही धोक्यात आलं आहे.  एकीकडे शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत तर मजुरांना देण्यासाठीही आता पैसे उरले नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच संतप्त झालाय. सरकार आमच्यासाठी काहीच करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

अवकाळी पावसामुळे राज्यातली शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या नजरा मायबाप सरकारकडं लागल्या असल्या तरी  राज्यातील सत्तास्थापनेचा घोळ संपत नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या सहनशीलतेला अंत झाला.

यवतमाळ जिल्ह्याच्या जांबगावातील राम ढोबळे या शेतकऱ्यानं आपल्या 5 एकरातील पिकावर नांगर फिरवलाय.हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचं पीक अवकाळी पावसामुळं उद्ध्वस्त झालंय. त्यामुळचं पिकावर  नांगर फिरवण्याची वेळ त्यांच्यावर आलीय.विशेष म्हणजे  महसूल विभागानं अद्यापही या नुकसानीची दखल घेतली नाही.

राम ढोबळे यांच्य़ा प्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची अवस्था झालीय. एकीकडं अवकाळी पावसामुळे  शेतकरी  देशोधडीला लागलाय तर

दुसरीकडं  अद्यापही सरकार स्थापनेचा घोळ सुटण्याचं नाव घेत नाही.त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं पीकही अवकाळी पावसामुळं  वाया गेलं.आता शेतकऱ्यांचे डोळे  राज्य सरकारच्या मदतीकडं लागले आहे. गेले काही दिवस सत्तास्थापनेच्या कवायतीत व्यस्त असलेल्या शरद पवारांनी गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.

ओल्या दुष्काळामुळं राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.राज्यात सत्तास्थापनेचा राजकीय गोंधळ सुरु असून  शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट झालाय. या पार्श्वभूमिवर सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार? आणि  बळीराजाला कधी दिलासा मिळणार? हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 08:35 AM IST

ताज्या बातम्या