अपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका

अपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका

पोलिसांची तब्बल 17 पथकं रवाना करत राज्यभर नाकाबंदी करून माहीसाठी शोध मोहीम राबवली गेली.

  • Share this:

गोविंद वाकडे,पिंपरी चिंचवड, 16 नोव्हेंबर : शहरातून अपहरण करण्यात आलेल्या एका 12 वर्षीय मुलीची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांनी यश आलं आहे. पोलिसांनी सर्व शक्ती पणाला लावत 10 तासांत ही कामगिरी केली आहे. माही जैन असं सुटका करण्यात आलेल्या मुलीचं नाव आहे. माही जैनचं अपहरण करून हिंजवडी जवळील नेरे गावात लपलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नितीन गजरमल जितेंद्र बंजारा असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे.

पिंपरी चिंचवड शहरातून काल (शुक्रवार) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अपहरणाची ही घटना घडली. माही जैन ही क्वीन्स टाऊन सोसायटीत राहणारी आहे. सोसायटी शेजारी असणाऱ्या एका दुकानात माही पेन्सिल आणण्यासाठी घरातून एकटीच बाहेर पडली.

पेन्सिल घेऊन परत येत असताना गाडीत थांबलेल्या दोघांनी तिला जबरदस्तीने गाडीत खेचलं. त्यावेळी माही ओरडली आणि तो आवाज दुकानदाराने ऐकला. पण दुकानदाराने धाव घेईपर्यंत ते अपहरणकर्ते माहीला घेऊन गेले होते. दुकानदाराने घडलेल्या प्रकाराबाबत माहीच्या पालकांना माहिती दिली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.

पोलिसांना ही बाब कळताच त्यांनी आपली तपासचक्र फिरवली. त्यानंतर पोलिसांची तब्बल 17 पथकं रवाना करत राज्यभर नाकाबंदी करून माहीसाठी शोध मोहीम राबवली गेली. त्यानंतर रात्री 8 वाजता पैश्याची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्यांचा माहीच्या वडिलांना फोन आला. पोलिसांनी लगेच फोनचं लोकेशन ट्रेस करत अखेर रात्री 2 वाजताच्या सुमारास माहीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करत तिला पालकांच्या ताब्यात दिलं.

VIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ

First published: November 16, 2018, 9:28 AM IST

ताज्या बातम्या