कार्ल्याच्या एकविरा देवी मंदिरात कळसाची चोरी

कार्ल्याच्या एकविरा देवी मंदिरात कळसाची चोरी

काल रात्री मंदिर बंद झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कळस चोरीला गेल्याचं कळतंय

  • Share this:

कार्ला,03 ऑक्टोबर: लोणावळ्या जवळील कार्ला येथील प्रसिद्ध एकविरा देवीचा कळस चोरीला गेला आहे.हे अत्यंत प्रतिष्ठित देवस्थान असल्याने या चोरीने खळबळ माजली आहे. कार्ल्याची एकविरा देवी ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कुलदेवता आहे.

कार्ल्याची एकविरा देवी ही राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.  काल रात्री मंदिर बंद झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कळस चोरीला गेला. हा कळस पंचधातूपासून बनला असून त्याला सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. पण तो कळस सोन्याचा असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.   या कळसाची किंमत सुमारे दोन लाख रूपये आहे .  दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास चालू आहे.  कार्ल्याची एकविरा आई ठाकरे कुटुंबियांची कुलदेवता आहे.अनेकदा या देवीच्या दर्शनास उद्धव ठाकरे येत असतात.

दरम्यान मंदिरात चोरी होण्याचीही पहिली घटना नाही. याआधीही कोकणातील दिवे आगारच्या मंदिरातून गणपतीची सोनेरी मूर्ती चोरीला गेली होती. आता या प्रकरणी दोषी कोण आहे आणि कळस परत मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

First published: October 3, 2017, 9:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading