Home /News /maharashtra /

रुग्णवाहिका मिळत नसल्याने पत्रकाराने बाइकने गाठले होते हॉस्पिटल, आज गावी झाले जंगी स्वागत

रुग्णवाहिका मिळत नसल्याने पत्रकाराने बाइकने गाठले होते हॉस्पिटल, आज गावी झाले जंगी स्वागत

शुभमच्या घरची परिस्थिती बेताची आहे. स्वतःचे शिक्षण, भावाचे शिक्षण करीत घर चालवतो. त्यात कोरोनाची लागण झाली.

कल्याण, 19 जुलै : कल्याण डोंबिवली परिसरात कोरोना व्हायरसमुळे परिस्थितीत बिकट झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णावाहिका न मिळाल्यामुळे स्वत: दुचाकी चालवत एका पत्रकाराने थेट हॉस्पिटल गाठले होते. आज कोरोनावर मात करुन आल्यानंतर गावी जल्लोषात स्वागत करण्यात आले. मलंगगड पट्ट्यातील ढोके गावातील पत्रकार/कॅमेरामॅन शुभम साळुंके याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. शहरात वेळेत रुग्णवाहिका मिळत नसल्याचे रोज दिसून येत होते. तोच प्रकार ग्रामीण भागात सुद्धा दिसून आला. कोरोनाची लक्षण जाणवायला लागल्यामुळे शुभम साळुंके याने रुग्णवाहिका मिळत नसल्याने स्वतः दुचाकी चालवत डोंबिवलीमधील आर.आर.हॉस्पिटल गाठले. शुभम पत्रकारितेचे शिक्षण घेत काम करून स्वतःचे घर सुद्धा चालवतो. शुभमच्या घरची परिस्थिती बेताची आहे. वडील नाहीत. स्वतःचे शिक्षण, भावाचे शिक्षण करीत घर चालवतो. त्यात कोरोनाची लागण झाली. मग पैसे आणणार कुठून असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. अखेर काही मित्रांच्या मदतीमुळे  आर.आर. हॉस्पिटलमध्ये शुभमला दाखल करण्यात आले. 7 दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षण न आढळल्यामुळे शुभमला डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर स्वतः पुन्हा आपल्या दुचाकीने डोंबिवली ते ढोके असा प्रवास केला.  विशेष म्हणजे कोरोनावर मात करत घरी आल्यावर अख्या गावाने  शुभमचं जंगी स्वागतच केलं. गावात चक्क फटाके आणि आतषबाजी केली. हार-फुले, दिवे लावत जोरदार स्वागत केले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या