सत्ता गेल्याने भाजप नेत्यांच्या मनावर परिणाम, तटकरेंचा सणसणीत टोला

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

दापोली, 28 डिसेंबर : 'सत्ता गेल्यामुळे भाजपच्या काही लोकांच्या मनावर परिणाम झाला असून त्यातूनच त्यांची चिडचिड सुरू आहे', अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अनेक नेते  महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना रायगड मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 'सत्ता गेल्यामुळे काही लोकांच्या मनावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच त्यांची चिडचिड सुरू आहे', अशी टीका तटकरेंनी केली.

तसंच, 'भाजप सत्तेचे दिवा स्वप्न पाहत आहे. भाजपकडून महाविकासआघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही असं बोललं जात आहे. परंतु, असे काही नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार चांगले काम करेल,' असंही तटकरे म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षाचे सरकार मजबूत विचारांवर आधारित आहे. महाविकास आघाडी सरकार राज्याचा सर्वांगीण विकास करेल, असा दावा तटकरेंनी व्यक्त केला.

भाजप आमदाराची जयंत पाटलांवर टीका

दरम्यान, नीरा देवघर प्रकल्पाच्या कालवा समितीतून एकूण चार सदस्यांना वगळण्यात आल्यानंतर आता भाजप आणि राष्ट्रवादीत वाकयुद्ध सुरू झालं आहे. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

'जलसंपदामंत्री जयंत पाटील हे आमची उपयुक्तता नसल्याने आम्हाला कालवा समितीतून वगळल्याचे कारण देत आहेत. जयंत पाटील महान नेते आहेत. त्यांची उपयुक्तता किती आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे,' असा खोचक टोला भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला आहे. तसंच राजकीय हेतूनेच आम्हाला या समितीतून वगळण्यात आल्याचा आरोप जयकुमार गोरे यांनी केला आहे.

कालवा समितीतून कुणा-कुणाला वगळलं?

राज्यात 2014 साली भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्र या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गडाला हादरा देण्यासाठी तिथल्या स्थानिक नेतृत्वाला बळ दिलं. तसंच काँग्रेसमधील नेते भाजपमध्ये घेऊन त्यांना विविध समित्यांमध्ये स्थानही दिलं.

नीरा देवघर प्रकल्पाच्या कालवा समितीत आमदार जयमकुमार गोरे, श्रीकांत देशमुख (प्रतिनिधी, पाणी वापर संस्था) विश्वास भोसले (माजी सनदी अधिकारी), उत्तमराव जानकर या  सदस्यांचा समावेश होता. मात्र, आता या चौघांना कालवा समितीतून वगळण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2019 05:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading