Home /News /maharashtra /

Aknath Shinde Guwahati : एकनाथ शिंदेंच्या संरक्षणासाठी गुवाहाटी येथील हॉटेलला पोलीस छावणीचे स्वरूप, CISF चे जवान तैनात

Aknath Shinde Guwahati : एकनाथ शिंदेंच्या संरक्षणासाठी गुवाहाटी येथील हॉटेलला पोलीस छावणीचे स्वरूप, CISF चे जवान तैनात

राज्यातील महाविकास आघाडीतील (eknath shinde) मोठा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत (shivsena) मोठी फुट पडली आहे.

  मुंबई, 22 जून : राज्यातील महाविकास आघाडीतील (eknath shinde) मोठा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत (shivsena) मोठी फुट पडली आहे. एकनाथ शिंदे  (eknath shinde shivsena)हे अपक्ष आमदारांसह शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटी (eknath shinde in guwahati) येथील एका हॉटेलमध्ये गेले आहेत. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi) सरकार धोक्यात असल्याचे दिसून येत आहेत. गुवाहाटी येथील ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. त्या हॉटेल बाहेर मोठा पोलीस (police protection) फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार माझ्यासोबत आहेत अजून आमदार माझ्यासोबत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसन येथे महाराष्ट्रातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. दरम्यान शिंदे काल सुरत येथील एका हॉटेलमध्ये राहिले होते. महाराष्ट्र आणि गुजरात लागून राज्ये असल्याने महाराष्ट्रातील  काही नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी येत असल्याने त्यांनी गुवाहाटी येथे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. शिंदे ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या हॉटेलबाहेर cisf चे जवान तैनात करण्यात आले आहेत. या हॉटेलला चारही बाजूंनी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी आणखी पोलीस फौजफाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  हे ही वाचा : बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडणार नाही, अखेर एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', नव्या इनिंगला सुरुवात

  अखेर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सुरत सोडले आहे. आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे.

  एकनाथ शिंदे आपल्यासह ३३ आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाले होते. पण सुरत हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे मध्यरात्रीच गुवाहाटीला जाण्याचा प्लॅन रचला त्यानुसार मध्यरात्रीच सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना एअरलिफ्ट केल्याचं समोर आलं आहे. काही तासांपूर्वीच सुरतच्या विमानतळावर तीन स्पाइसजेटच्या विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहे. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्टकरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती.

  हे ही वाचा : प्रहारचे बच्चू कडू, शंभुराज देसाई ते अनेक दिग्गाजांची शिंदेंना साथ, बंडखोरांचा पहिला PHOTO समोर

  सुरतच्या ली मॅरेडियन हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी तीन बसेस दाखल झाल्या होत्या. यातूनच आमदारांना एअरपोर्टपर्यंत नेण्यात आलं. बंडखोर आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी त्यांना हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आमदारांचे नातेवाईकही त्यांना भेटायला येऊ शकतात. यासाठी सर्व बंडखोर आमदारांना हलवण्यात येणार आहे. सुरत एअरपोर्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Shiv Sena (Political Party)

  पुढील बातम्या