धक्कादायक! एक्स्प्रेसमध्ये महिला कोचच्या पायऱ्यांवर आढळलं व्यक्तीचे शीर

धक्कादायक! एक्स्प्रेसमध्ये महिला कोचच्या पायऱ्यांवर आढळलं व्यक्तीचे शीर

घटनेची माहिती मिळालेल्यानंतर आंध्रप्रदेशातील काजीपेठ लोहमार्ग पोलीस येऊन हे शीर काजीपेठला घेऊन गेले.

  • Share this:

नागपूर, 24 फेब्रुवारी : सिंकदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायऱ्यांवर एका अज्ञात व्यक्तीचं शीर पडलेलं आढळलं. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली. गाडीच्या पायाऱ्यांवर एका व्यक्तीचं शीर कसं आणि कोणी आणलं अशा प्रश्नांनी प्रवाश्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळालेल्यानंतर आंध्रप्रदेशातील काजीपेठ लोहमार्ग पोलीस येऊन हे शीर काजीपेठला घेऊन गेले. काजीपेठला सापडलेलं धड आणि हे सापडलेलं शीर मेयो रुग्णालयाच्या शितगृहामध्ये पाठवण्यात आलं. आत्महत्या केलेल्या या व्यक्तीविषयी अधिक माहिती घेतली जात आहे.

काल सकाळी काजीपेठ इथं एका व्यक्तीने रेल्वे रुळांवर आत्महत्या केली. त्यावेळ त्याचं शीर या गाडीच्या पायऱ्यांवर अडकून पडल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर १२७७१ सिकंदराबाद-नागपूर एक्स्प्रेस शनिवारी सकाळी ८.१५ वाजता आली. या गाडीची तपासणी करीत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना इंजिनजवळील महिला कोचच्या पायदानात एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके फसलेले असल्याचे आढळले. लगेच त्यांनी याची सूचना उपस्टेशन व्यवस्थापक आणि लोहमार्ग पोलिसांना दिली.

लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हे मुंडके सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या महिला कोचच्या पायदानात फसलं होतं. मुंडके बाहेर काढलं असता कानाच्या वरील भागाला मार लागल्याचे आणि कपाळ फुटल्याने कानातून रक्त निघाल्याचे दिसलं.

दरम्यान काजीपेठ येथे एका व्यक्तीचे धड आढळल्याचे समजताच लोहमार्ग पोलिसांनी काजीपेठ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधून सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये अडकून मुंडके नागपुरात आल्याची माहिती दिली. लगेच काजीपेठ लोहमार्ग पोलीस नागपूरला निघाले. सायंकाळी ५ वाजता ते मुंडके घेऊन काजीपेठला रवाना झाले. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

Live Murder Video: 30 वेळा मित्राला भोसकलं, नंतर अंगावर गाडी घालून निघून गेला...!

First published: February 24, 2019, 2:36 PM IST

ताज्या बातम्या