Home /News /maharashtra /

राज्यपाल हे शहाणे आहे, त्यामुळे राहायचे की.., शरद पवारांची गुगली

राज्यपाल हे शहाणे आहे, त्यामुळे राहायचे की.., शरद पवारांची गुगली

'राज्यपाल हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ही प्रतिष्ठा राखायला हवी'

    मुंबई, 19 ऑक्टोबर : मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर वाद निर्माण झाला आहे. खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यपालांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे 'राज्यपालांनी आता त्या पदावर राहावे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे', अशी गुगली शरद पवार यांनी टाकली आहे. 'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जी भाषा वापरली, त्याबद्दल अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी तशी भाषा वापरायला नको होती. मी आजपर्यंत अनेक राज्यपाल पाहिले. सत्तेत असताना अनेक राज्यपालांशी  संबंधही आला. पण, असे भाष्य करण्याचे धाडस कुणी केले नाही. राज्यपाल हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना  या पदाची प्रतिष्ठा राखता आली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची ही प्रतिष्ठा राखायला हवी, राज्यपालपदावर आता त्यांना राहायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे, असं सूचक विधान पवार यांनी केले आहे. तसंच, गृहमंत्र्यांनी आता स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्याकडे एक म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार, त्यामुळे ही म्हण इथे लागू होत आहे की नाही ते पाहावे लागेल. पण राज्यपाल हे  शहाणे आहे, त्यामुळे हा शब्द योग्य आहे की नाही, ते मला माहिती नाही, असा सणसणीत टोलाही शरद पवारांनी राज्यपालांना लगावला. दरम्यान,  शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशावर भूमिका स्पष्ट केली. 'एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. आणि त्यामुळे त्याचं कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे, असं पवार म्हणाले. तसंच, 'गेली 25 वर्ष पाहिली तर सर्वात प्रभावी विरोधीपक्ष नेते म्हणून खडसेंची ओळख आहे. पण, दुर्दैवाने त्याची दखल घेतली गेली नाही. त्यांना त्याबद्दल दु: ख वाटत असेल. त्यामुळे आपल्या कामाची जिथे नोंद घेतली तिथे जावे वाटते का, असा विचार करत असतील. पण, त्यांना आमच्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काही करता येणार नाही' असं सूचक विधानही पवारांनी केले. अमित शहा यांनी न्यूज18 नेटवर्कला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अमित शहा यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त केली होती. काय आहे वाद? राज्यात मंदिरं उघडण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे.  'ठाकरे, तुम्ही कट्टर हिंदुत्व विचारांचे आहात. तुम्ही अयोध्या राम मंदिरला गेला होता. मुख्यमंत्री झाल्यावर आषाढी एकादशी पंढरपूर येथे पूजा केली' अशी आठवणच राज्यपालांनी करून दिली होती. खुद्द राज्यपालांनी अशा शब्दांत पत्र लिहिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तर, 'आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून पलटवार केला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या