पुणे, 23 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण हा गेल्या 25 वर्षांत राजकीय बळी गेलेला विषय आहे. त्यामुळे राजकीय परिघाबाहेर जाऊन चर्चा करूनच मराठा आरक्षणावर मार्ग काढता येईल, असं मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केलं आहे. त्यासाठी तज्ज्ञ, विचारवंत यांची गोलमेज परिषद बोलवण्यात यावी, असंही ते म्हणाले.
हेही वाचा...मराठा समाजास ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण नको, काँग्रेस मंत्र्याची भूमिका
एवढंच नाही त राजेंद्र कोंढरे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकार मराठा मोर्चाच्या 150 कार्यकर्त्यांचे फोन टॅप करत आहे, असा थेट आरोप राजेंद्र कोंढरे यांनी केला आहे. काल जाहीर केलेल्या योजना म्हणजे जुन्या योजनांना पॉलिश केलं आहे. राज्य सरकार एकेक दिवस पुढं ढकलत आहेत, अशी टीका देखील राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे.
सारथी संस्थेत 1000 कोटींची तरतूद करावी, त्याचबरोबर 25 लोकांची नियुक्ती करावी. M phil, phd धारक विद्यार्थ्यांची अडकलेली शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी कोंढरे यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठवण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय त्याला सहकार्य असेल. ओबीसींनी 2 पावलं पुढं यावं, मराठा समाजनं देखील 2 पावलं पुढं येईल, 4 पावलं मागेही जाईल, असंही कोंढरे यांनी सांगितलं.
10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक...
कोल्हापुरात बुधवारी झालेल्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. येत्या 10 ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद शांततेत केला जाणार आहे. 'महाराष्ट्र बंद' दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, 15 दिवसांत सरकारनं निर्णय घेतला तर 'महाराष्ट्र बंद' मागे घेऊ, असं मराठा आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा...मुंबईकरांनो सावध राहा, हवामान विभागाने दिला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा!
मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलनं केली जात आहेत तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात आज (बुधवारी) राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली. मराठा आरक्षणासाठी यापुढे 'थोबाड फोडो आंदोलन' करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही, असा इशारा मराठा गोलमेज परिषदेत मराठा समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक यांनी दिला आहे.
हेही वाचा...सावधान! फेक ऑक्सिमीटर App वापरणं ठरू शकतं धोकादायक
विजयसिंह महाडिक यांनी सांगितलं की, मराठा समाज आता गनिमी काव्यानं आंदोलन करणार आहे. गोलमेज परिषदेत एकूण 15 ठराव सर्व सहमतीनं मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 'थोबाड फोडो आंदोलन' करण्यात येणार आहे. मात्र, सुरूवात कोणत्या नेत्यापासून करणार, हे सांगणार नाही. आरक्षणाला स्थगिती मिळताच पोलीस भरतीची घोषणा करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशीही केली मागणी करण्यात आली आहे.