Home /News /maharashtra /

'तो मोदी नावाचा गावगुंड पोलिसांच्या ताब्यात', नाना पटोलेंचा भाजपवर पलटवार

'तो मोदी नावाचा गावगुंड पोलिसांच्या ताब्यात', नाना पटोलेंचा भाजपवर पलटवार

भाजप कोरोनाचे नियम तोडून आंदोलन करतंय. मी भाषणात बोलत नव्हतो. मी लोकांना हिंमत देण्यासाठी बोलत होतो

    नागपूर, 18 जानेवारी : 'मोदींना मी मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो' असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजपने आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे भंडारा पोलिसांनी (bhandara police) कथित मोदी गावगुंडाला ताब्यात घेतले आहे. भाजप मूळ मुद्याला बगल देण्यासाठी विषयाचा आणि वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करत आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते ठिकठिकाणी नाना पटोले यांच्या विधानाच्या विरोधात राज्यभरात भाजप आंदोलन करत आहे. नागपूरमध्ये आल्यानंतर नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानाचे स्पष्टीकरण देत भाजपवर हल्ला चढवला आहे. 'भंडारा पोलिसांनी कथित मोदीला पकडले आहे. लोकांचे बयान घेतले आहे, ज्यांनी तक्रार केली त्याचे ही बयान झाले आहे. भंडारा पोलिसांना मी सांगितले आहे की याचा तपास करा. तसा गावगुंड नसेल तर माझ्यावर कारवाई करा. हा गावगुंड कोण आहे, याचा भंडारा पोलीस तपास करत आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं. गुंड मोदीचे टोपण नाव मोदी आहे त्याचा मूळ नाव आणि गाव भंडारा पोलिसांना विचारा, याच गाव गुंडाने माझ्या विरोधात प्रचार केला होता आता लोकांनीच मला ती माहिती दिली आहे, मी काही सभेत बोललो नाही, तर लोकांशी बोलत असताना मोदीला मारण्याबद्दल बोललो होतो, असंही पटोले यांनी सांगितलं. तसंच, 'भाजप मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी, विषयाचा, वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करत आहे. पंतप्रधानपद हे एका पक्षाचे नसते, ते देशाचे असतात. मात्र भाजप कोरोनाचे नियम तोडून आंदोलन करतंय. मी भाषणात बोलत नव्हतो. मी लोकांना हिंमत देण्यासाठी बोलत होतो. काँग्रेस प्रधानमंत्री पदाचा आदर करते', असंही पटोले म्हणाले. 'भाजपची तालिबानी व्यवस्थेशी जुळली आहे. त्याच प्रत्यय आता येत आहे, भाजपच्या आंदोलनाबाबत आपण निषेध करतोय. पंतप्रधानपदीचा मान घालवणाऱ्या या आंदोलना विरोधात काँग्रेसकडून पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे', असंही पटोले म्हणाले. पटोलेविरोधातील आंदोलनात भाजपचे कोरोना पॉझिटिव्ह आमदारही पोहोचले! दरम्यान,  नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना अटक व्हावी यासाठी भाजपचे कोरोना पॉझिटिव्ह आमदार आज शंभर कार्यकर्त्यांसह नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यासमोर दाखल झाले. या कोरोना पॉझिटिव्ह आमदारांचं कृष्णा खोपडे असं नाव आहे. खोपडे हे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. खोपडे यांनी भाजपच्या 100 कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं. यावेळी भाजपचे दुसरे आमदार प्रवीण दटके हे देखील उपस्थित होते. भाजप आमदार कृष्णा खोपडे हे 13 जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याबाबत त्यांनी स्वत: ट्विटरवर माहिती दिली होती. विशेष म्हणजे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी आमदार खोपडे हे कार्यकर्त्यांसह आंदोलनात दिसले. नागपुरात एककीकडे कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढताना दिसत असताना लोकप्रतिनिधींनीच अशाप्रकारे बेजबाबदार वागणं किती जनहिताचं आहे? असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान, खोपडे यांना कोरोना विषयी विचारलं तेव्हा त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ला घेऊनच आपण बाहेर पडल्याची प्रतिक्रिया दिली.
    First published:

    Tags: Nana Patole, भाजप

    पुढील बातम्या