चांदवड, 7 नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या दौऱ्यात सोन्याची साखळी लंपास करून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे चांदवड पोलिसांनी सापळा रचून चोरट्याला बीडमधून अटक केली आहे. त्याच्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
हेही वाचा...शरद पवारांचं बारामती हादरलं! विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात वयोवृद्धाची आत्महत्या
मिळालेली माहिती अशी की, चांदवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 24 ऑक्टोबरला सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एकनाथ खडसे हे मुंबईहून जळगावकडे जात होते. चांदवंड तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांचं चांदवड चौफुलीवर स्वागत व सत्कार करण्यात आला होता. यावेळी प्रसाद आबासाहेब देखमुख (रा.लोणेर, ता. देवळा, जि. नाशिक) यांच्या गळ्यातील 128 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यानं लांबवली होती. या प्रकरणी चांदवड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथकही रवानं झालं होतं. मात्र, गुप्त माहितीच्या आधारे चांदवड पोलिसांनी सापळा रचून चोरट्याला बीड येथून अटक केली आहे. त्याच्याकडून 7 लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गर्दीचा फायदा घेऊन आरोपीनं 128 ग्रॅन सोन्याची चैन लंपास केली होती. त्यामुळे कोणताही सुगावा लागत नव्हता. मात्र खडसे यांचा सत्कार केला जात असताना त्याची मोबाईलवर शूटिंग करण्यात आली होती. त्या व्हिडीओमध्ये हा चोरटा आढळून आला होता. त्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत होते.
पोलीस आयुक्ताकडून निरीक्षकांची कानउघाडणी...
दुसरीकडे, नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे यांनी नाशिक रोड पोलिस निरीक्षकांची कानउघाडणी केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिकरोड येथील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर उपनगर आणी नाशिकरोड पोलीस स्टेशनची पाहणी केली यावेळी त्यांनी नासिक रोड पोलीस निरीक्षकांसह अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
हेही वाचा...शिवसेना रुग्णवाहिकेच्या चालकाला लुटणाऱ्या महिलेचा 'प्रताप' ऐकून पोलिसही थक्क
कामकाज हे एक नंबर वरून शेवटच्या नंबरवर आले आहे, अशा शब्दांमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे अधिकाऱ्यांना सुनावले. गावठी कट्टे, कोयते, तलवारी मोठ्या प्रमाणावर सापडत आहे. मारामाऱ्या, लूटमार, व्हाइट कॉलर गुन्हेगारी, दरोडे खुनाच्या घटना ही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिक रोड उपनगर पोलीस स्टेशनला भेट देत गुन्हेगारीचा आढावा घेतला.
आयुक्त पांडे यांनी नाशिक रोड पोलिस स्टेशन येथील जुन्या इमारतीची पाहणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, नाशिक रोड कारागृहाचे पोलीस अधीक्षक प्रमोद वाघ, अशोक कारकर यांच्यासह पोलीस अधिकारी आणी कर्मचारी उपस्थित होते.