Home /News /maharashtra /

..अजून तिने नीट डोळेही उघडले नव्हते, 41 तासांच्या बाळाचा आईनेच घोटला गळा

..अजून तिने नीट डोळेही उघडले नव्हते, 41 तासांच्या बाळाचा आईनेच घोटला गळा

काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना सांगलीमध्ये घडली आहे. सुमित्रा गंगाप्पा जुट्टी असं या महिलेचं नाव आहे.

सांगली, 19 ऑक्टोबर : मुलीच्या जन्मानंतर अवघ्या काही वेळात जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या बाळाच्या गळा दाबून खून केल्याची मनसुन्न करणारी घटना सांगलीत घडली आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी निष्ठुर मातेवर मुलीच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना सांगलीमध्ये घडली आहे.  सुमित्रा गंगाप्पा जुट्टी असं या महिलेचं नाव आहे. ही महिला कर्नाटक इथं राहणारी आहे. पोलिसांनी या महिलेला अटक केली असून तिच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुमित्रा गंगाप्पा जुट्टी ही महिला प्रसूतीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होती. त्यानंतर शनिवारी त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र, त्यानंतर काही वेळाने तिने आपल्या या नवजात मुलीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या घटनेची माहिती त्या ठिकाणी वार्डमध्ये असणाऱ्या एका महिलेने, डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी परिचारिकेला पाठवून त्या नवजात अर्भकाची तपासणी करण्यास सांगितले असता, त्या मुलीच्या गळ्यावर व्रण आढळून आले. त्यांनतर रुग्णालय  प्रशासनाकडून त्या मुलीवर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्रीच्या सुमारास त्या नवजात मुलीचा मृत्यू झाला आहे. अवघ्या 41 तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा तिच्याच आईनेच गळा आवळून निष्ठुरपणे खून केल्याची धक्कादायक घटने रुग्णालयात हादरून गेले आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात  सुमित्रा गंगाप्पा जुट्टी या निर्दयी मातेवर स्वतःच्या मुलीचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या