पुण्यात बुधवार पेठेत वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या तरुणीवर फेकले ॲसिड

पुण्यात बुधवार पेठेत वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या तरुणीवर फेकले ॲसिड

पुण्यात बुधवार पेठेत वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या तरुणीवर एका ग्राहकाने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 15 जून- पुण्यात बुधवार पेठेत वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या तरुणीवर एका ग्राहकाने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने ॲसिड कमी तीव्रतेचे असल्याने तरुणीच्याला गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे हे प्रकरण?

पीडितेच्या जबाबावरून फरासखाना पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणी आणि आरोपी हा पश्चिम बंगाल राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवार पेठेतील एका इमारतीमध्ये राहणारी 22 वर्षीय तरुणी वेश्‍या व्यवसाय करते. आरोपी तरुण हा तिचा नियमित ग्राहक होता. आरोपी शिवाजीनगर परिसरातील एका हॉटेलात भांडी धुण्याचे काम करतो. गुरुवारी (13 जून) दुपारी तो तिच्याकडे आला गेला होता. दरम्यान, तरुणीने आरोपीच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. ॲसिड तिच्या डोळे आणि नाकात गेले. चेहरा भाजल्याने तिने आरडाओरड केली आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. तरुणीला तातडीने जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बाथरूम साफ करण्यासाठी वापरण्याचे हे ॲसिड होते. यामुळे तरुणीला गंभीर दुखापत झाली नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. फरासखाना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पुरंदरमध्ये शाळकरी मुलीवर बलात्कार

एका 13 वर्षांच्या शाळकरी मुलीवर 55 वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोडीत येथे ही घटना घडली आहे.

कोडीत धनगर समाजाचे कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी पाल टाकून उतरले होते. गेल्या 10 जूनला सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मेंढपाळ कुटुंबातील 13 वर्षांची मुलगी पालाबाहेर खेळत होती. याच सुमारास आरोपी राजू बडदे हा तेथे दुचाकीवरून आला. त्याने शेतातून स्प्रिंकलर मशीन आणायचे आहे. मशीन धरून बसण्यासाठी तू माझ्याबरोबर चल, असे सांगत या मुलीला दुचाकीवरून शेतात घेऊन गेला. शेतात गोठ्यावर दुचाकी उभी करून तिला शेजारच्या चारीत स्प्रिंकलर मशीन आहे, ती घेऊन यायला सांगितले. ती चारीत गेल्यानंतर आरोपीने तिच्या पाठीमागे जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला कोणाला सांगितलंस तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. नंतर पीडित मुलीला पालाजवळच्या रस्त्यावर सोडून दिले.

घाबरलेल्या या मुलीने आपल्या घरी बहीण व आईला हा घडलेला प्रकार सांगितला. मुलीचे वडील बाहेरगावी गेले असल्याने घाबरून त्यांनी कोणाकडे ही याची वाच्यता केली नाही. गुरुवारी सायंकाळी वडील घरी आल्यानंतर त्यांना झाला प्रकार सांगितला. वडिलांनी मुलीला घेऊन थेट सासवड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. सासवड पोलिसांनी आरोपी राजू बापूराव बडदे (वय- 55, रा. कोडीत, पुरंदर) याला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

मेट्रो ट्रेनमध्ये हँडलला प्रवासी लटकले, काय आहे व्हिडिओमागचं सत्य?

First published: June 15, 2019, 10:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading