• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भिवंडीत इमारतीचा भाग कोसळला, एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर 7 जखमी

भिवंडीत इमारतीचा भाग कोसळला, एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर 7 जखमी

 या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाले नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाले नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाले नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:
भिवंडी, 03 ऑगस्ट : भिवंडी (bhivandi) शहरातील आजमी नगर (aajminagar) परिसरात असलेली एक मजली इमारतीची गॅलरी कोसळल्याची ( building collapsed in bhivandi) घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील आजमी नगर टिपू सुलतान चौक परिसरात शब्बीर अंसारी यांचे राहते घर होते. मार्केट परिसरात असलेल्या या घराच्या आजू बाजूला शब्बीर यांनी घराच्या गॅलरीवर वाढीव अधिकृत बांधकाम केले होते. या इमारतीच्या खाली किराणा दुकान तसंच इतर दुकानं होती. मार्केट परिसर व दुकानं असल्याने याठिकाणी नागरिक खरेदीसाठी आले होते. त्यावेळी वाढीव गॅलरी व घराचा भाग खरेदीसाठी आलेल्या नागरिकांवर कोसळल्याने या दुर्घटनेत एक जण मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. नशा औषधांची ! नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या मेडिकलवर पोलिसांची धाड रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असं दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचं नाव आहे. तर हसीम शेख (३५), सुबेदा खातून (३५) , अमिना अन्सारी (४५) , रोशन बानो (३०), जारा कलाम (१२), रोजी फातिमा (१४) आणि जिकरा अन्सारी (१४) अशी जखमींची नावं आहेत. कसं होतं सिद्धार्थचं Quarantine Life, बघा त्याच्या घरातला हा खास Video विशेष म्हणजे, या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाले नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमी झाले आहे.  जखमींना शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल , पोलीस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक दाखल होत मदत कार्य सुरू होते. भोईवाडा पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published: