मुंबई, 4 मार्च : आईसोबत अनैतिक संबंध असल्याने रागाच्या भरात मुलाने आपल्या मित्राला धावत्या ट्रेनमधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या कक्ष 10 ने मंगळवारी आरोपीला अटक केलं आहे.
रशीद उर्फ राजू सय्यद हा बेपत्ता झाला होता. यासंदर्भात पोलिसांनी तो हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. पोलिसांकडून यासंदर्भात तपास केला जात होता. नाशिक येथील रेल्वे ट्रॅकवर त्याचा मृतदेह आढळल्याने सर्वांना धक्काच बसला होता. अशा प्रकारे त्याचा मृतदेह सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर रशीदच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याची बाब समोर आली. रशीद व अन्वर हे दोघेही चांगले मित्र होते. यांचे नेहमी घरात येणं जाणं असायचं. रशीदचे आपल्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय आला होता. त्याचा राग त्याच्या डोक्यात होता. अन्वर (19 वर्ष) व रशीद हे दोघेही पाकिटमार होते. त्यामुळे बऱ्याचदा ते एकत्र राहायचे आणि लोकलमध्ये एकत्र चोऱ्या करायचे. रशीदचे आपल्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयमुळे अन्वर प्रचंड रागात होता. ती गोष्ट त्याला सतत त्रास देत होती.अन्वरच्या डोक्यातून हा विषय जातच नव्हता. एकदा चोरीचा माल वाटून घेण्याबाबत दोघांमध्ये वाद झाला. या रागात अन्वरने रशीदला धावत्या लोकलमधून ढकलून दिलं. यातच रशीदचा मृत्यू झाला.
हे वाचा - क्राईम पेट्रोल बघून केलं ‘क्राईम’, 21 वर्षीय तरुणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला कट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.