विजेचा शॉक देऊन पकडणार होते मासे पण झाले उलटे, चुलते-पुतण्याचा मृत्यू

विजेचा शॉक देऊन पकडणार होते मासे पण झाले उलटे, चुलते-पुतण्याचा मृत्यू

सांयकाळी नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. ऐन दिवाळीत रुपनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Share this:

बीड, 13 नोव्हेंबर :  विजेचा शॉक (electric shock) देऊन मासे पकडणे दोन तरुणांच्या जीवावर घेतला आहे. नदीच्या डोहात सोडलेला विजेचा शॉक लागून दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातील (Beed) धारूर तालूक्यातील काळ्याचीवाडी येथे घडली आहे.

समाधान सहदेव रुपनर (वय 21) आणि  दिपक मारूती रुपनर ( वय 19 )अशी मृतांची नावे असून ते नात्याने चुलते-पुतणे होते. गुरुवारी सांयकाळी नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. ऐन दिवाळीत रुपनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

1 डिसेंबरपासून देशभरात पुन्हा लागू होणार लॉकडाऊन? वाचा काय आहे सत्य

गुरुवारी सायंकाळी गावापासून एक कि.मी असणाऱ्या नदीच्या डोहात विजेचा प्रवाह सोडून  मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, हे त्यांच्या अंगलट आले. डोहात विजेचा प्रवाह सोडला होता, पण पाण्याचा स्पर्श झाल्यामुळे दोघांना विजेचा धक्का बसला. दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

बराच वेळ झाला तरी दोघेही घरी परतले नाहीत म्हणून समाधानचे वडील काही ग्रामस्थांसह नदीकडे गेले. त्यावेळी त्यांना दोघेही मृत अवस्थेत आढळून आले. मृतामधील समाधान हा पोलीस भरतीची तयारी करत होता, तर दिपक आयटीआयची परीक्षा देऊन आला होता.

रश्मी ठाकरे यांच्यावर जमीन व्यवहाराचा आरोप, संजय राऊत म्हणाले...

धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली करण्यात आली आहे. मात्र, ऐन दिवाळीत झालेल्या घटनेने काळ्याचीवाडी गावावर शोककळा पसरली आहे. तसंच चुकीच्या पद्धतीने मासे पकडणे अंगलट आल्यामुळे इथून पुढे तरी मासे पकडण्यासाठी अशी पद्धत वापरू नये, असं आवाहन पोलिसांनी केले आहे.

Published by: sachin Salve
First published: November 13, 2020, 12:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या